वसमत: हिंगोली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष आहे विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे कडून हिंगोली जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी, सिद्धार्थ गोवंदे यांची छत्रपती संभाजी नगर विभागातील उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
दिनांक १९ व २० जानेवारी रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील क्रांतिभूमी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव मा. हर्षदीप कांबळे यांनी केले. कार्यशाळेला विशेष उपस्थिती म्हणून बार्टीचे मा.सुनील वारे निबंधक मा.विशाल लोंढे,कार्यशाळेचे मुख्य संयोजक व विभाग प्रमुख डॉ.बबन जोगदंड, प्रकल्प व्यवस्थापक सुमित थोरात यांच्यासह बार्टीचे महाराष्ट्रातील प्रकल्प अधिकारी व समतादूत उपस्थित होते.
या कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते सिद्धार्थ गोवंदे यांना प्रशस्तीपत्र, गौरव चिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. मिलिंद आळणे, सुरेश पठाडे, गुरुनाथ गाडेकर, ॲड. रहीम कुरेशी,सुकेश कांबळे . बालाजी कटारे,गजानन अंभोरे, सुनीता आवटे,संगीता खांदळे, शंकर पोघे जिल्हाभरातून सरांचे कौतुक केले जात आहे.

