मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन म्हणजे केवळ स्मृतिदिन नाही तर विचारांची, संघर्षाची आणि मानवतेची आठवण जपण्याचा दिवस आहे.ज्यांनी स्वतःच्या आयुष्याला जळत्या झाल्यासारखं पेटवून समाजाच्या अंधारात प्रकाश पेरला त्या महामानवाला आज स्मरण करताना मन अभिमानाने भरून येतं त्यांनी दिलेली समानतेची शिकवण स्वाभिमानाची जाणीव आणि शिक्षणाची क्रांती आजही प्रत्येक पिढीला उभे राहायला ताकद देते. डॉ बाबासाहेबांच कार्य हे एका व्यक्तीचं नव्हे,तर ते संपूर्ण मानवजातीचं उध्दरकार्य होते. महापरिनिर्वाणदिन आपल्याला सांगतो त्यांनी दिलेल्या विचारांना अधिकारांना आणि स्वातंत्र्याला आपण जगत राहिलो तरच त्यांचे पुण्यस्मरण पूर्ण होतं कारण बाबासाहेब केवळ इतिहासात नाहीत..ते प्रत्येक जागरूक श्वासात आजही जिवंत आहेत.
आयु. दत्तात्रय कोकाटे अध्यक्ष दौंड तालुका ग्रामीण यांचे अध्यक्ष ते खाली दिनांक 6 डिसेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका ग्रामीण यांचे वतीने दौंड येथे असंख्य बहुजन समाज व कार्यकर्त्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासमोर मानवंदा देण्यात आली बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित आली व त्रिशरण पंचशील घेण्यात आले यावेळी यावेळी खालील अधिकारी पदाधिकारी व इतर बौद्धजन उपस्थित होते अध्यक्ष आयुष्यमान दत्तात्रय कोकाटे सरचिटणीस आयुष्यमान दादा मोरे जिल्हा संघटक आयुष्यमान पिंटू डाळिंबे आयुष्यमान बाळकुंदरी संघटक आयुष्यमान श्रीकांत साळवे संस्कारा उपाध्यक्ष आयुष्यमान कांबळे सर कार्यकर्ते आयुष्यमान गायकवाड राजू बाबुराव संघटक दादा रणसिंग आणि इतर सर्व कार्यकर्ते समवेत होते. कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला.

