Thursday, February 26, 2026
Homeदौंडसुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची 113 वी जयंती उत्सव संपन्न

सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची 113 वी जयंती उत्सव संपन्न

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी आयुष्य वाहिले आंबेडकरी चळवळ संघटित ठेवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती दलित, शोषित, वंचित समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी संर्घर्ष केला तसेच चैत्यभूमीचे शिल्पकार व राष्ट्राध्यक्ष साहित्य भूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या 113 वी जयंती साजरी करण्यात आली सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सामूहिक त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत दौंड तालुका शाखेचे वतीने कार्यक्रमाचे ठिकाण दौंड तालुका माजी अध्यक्ष आयु. श्रीकांत शिंदे यांचे निवासस्थानी दिनांक 12 12 2025 शुक्रवारी सकाळी ठीक दहा वाजून 30 मिनिट या वेळेत पार पडला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड राजेंद्र गुरुजी मनोगत व्यक्त केले दौंड तालुका अध्यक्ष आयु. दत्तात्रय कोकाटे व पुणे जिल्हा पूर्वचे संघटक डाळिंबे गुरुजी तसेच तालुका संघटक आयु.मयूर पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले आयु. श्रीकांत शिंदे, यांनी आभार मानले यावेळी तालुका संघटक आयु. श्रीकांत साळवे उपासक आयु. घोडके गुरुजी व आयु. शिंदे गोपाळ गुरुजी हजर होते सदर कार्यक्रम दौंड तालुका अध्यक्ष आयु. दत्तात्रय कोकाटे यांचे अधिपत्याखाली पार पडला त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. बाळकुंदरी गुरुजी यांनी केले कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला

- Advertisment -

Most Popular

Recent Comments