Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्यामहापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीस सौ. सरिताताई कुऱ्हाडे यांच्यावतीने अभिवादन करण्याकरिता बालाजीनगर मधील शेकडो...

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीस सौ. सरिताताई कुऱ्हाडे यांच्यावतीने अभिवादन करण्याकरिता बालाजीनगर मधील शेकडो महिलानं सह दादरला पोहल्या.

प्रतिनिधी मुंबई दि. ६ डिसेंबर २०२५ आजचा दिवस ६ डिसेंबर हा परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन! या देशाच्या इतिहासातील हा एक अत्यंत दु:खद दिवस आहे. या दिवशी देशातील सामान्य जनतेचा मुक्तीदाता सर्वांना पोरके करून निघून गेला.
या दिवशी आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने जनता चैत्यभूमि येथे अभिवादन करण्याकरिता येते. या मूक्तीदात्यास अभिवादन करण्यास व बाबासाहेबाच्या विचाराची शिदोरी घेऊन जाण्यासाठी सौ. सरिताताई योगेश कुऱ्हाडे प्रभाग क्र. ८ (क) सर्वसाधारण महिला गट बालाजीनगर येथून शेकडो महिलानंसह दादरला पोहचल्या प्रवासात त्यानीं बाबासाहेबांचे विचार महिलाना सांगताना म्हणाल्या कि बाबासाहेब म्हणायचे ‘नाचून मोठे होऊ नका. तर वाचून मोठे व्हा, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा .. माझे अपूर्ण राहिलेले काम प्राणपणाने पूर्ण करा. जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल.’ अशा विचारानंची देवाणघेवाण करत प्रवास केला.
पुढे त्या बोलल्या कि संविधान निर्मात्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आल्यावर आपल्या प्रभागात ‘कोणी कसेही वागो, पण आपण मात्र आपल्या प्रभाग क्र. ८ (क) मध्ये संविधानाचे पालन करून आदर्श नागरिक म्हणून जगणार व या देशाला नवी दिशा देणार’ असा दृढनिश्चय सर्वानुमते यावेळी करण्यात आला!
यावेळी मनीषा कसबे, निर्गुना म्हस्के, आरती शिंदे, सुशीला दिहवार, सालन शितोळे, ललिता बारूत, शारदा मिसाळ, सत्यशीला गायकवाड, कालावती बनसोडे, सोनाली गोटे, संध्या शिंदे, कल्पना बनसोडे व शेकडो बालाजी नगर मधील महिला उपस्थित होत्या.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments