वसमत प्रतिनिधी आळणे मिलिंद
वसमत : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संबोधी बुद्ध विहार हर्षनगर वसमत येथे भैयासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . या प्रसंगी ॲड रणधीर तेलगोटे , रघुवती सरोदे यांच्या हस्ते सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . रावण नंद यांनी सामूहिक त्रिशरण , पंचशील बुद्ध वंदना व इतर गाथा घेतल्या . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आनंद वाहेवळ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक रघुपती सरोदे, मेजर भगावन सुर्यतल आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी रघुपती सरोदे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावर आंबेडकर चळवळीची धुरा सांभाळीत होते .बौद्ध धम्म वाढण्याकरता विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेऊन धम्म वाढविण्याचा प्रयत्न केला .भैय्यासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी उभारण्या करता फार मोठे योगदान असून याठिकाणी आज लाखो भिम सैनिक हे वंदन करण्याकरता येत असतात .भारतीय बौद्ध महासभेचे संघटन वाढून प्रत्येक गावी शाखा स्थापन केल्या व या शाखेच्या माध्यमातून लोकांना संघटित केले . तसेच धार्मिक ,राजकीय संघटननिर्माण केल्या . मेजर भगवान सूर्यतळ यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांचे विविध प्रकारच्या कार्यावर प्रकाश टाकला . सुत्र संचालन रावण नंद यांनी केले तर आभार साहेबराव सरोदे यांनी मानले . या कार्यक्रमाला ॲड रणधीर तेलगोटे, दै . सम्राटचे प्रतिनिधी अनिल पंडित , बार्टीचे मिलिंद आळणे, संभाजी कसबे यांच्यासह उपासक , उपासिका व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

