कराड : दिनांक 6 डिसेंबर 2025 भारतरत्न ,शिक्षणाचा महामेरू, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून कार्वे थोरात मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाण महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करून त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा जिल्ह्यात झाले असल्याने प्राथमिक शाळेमध्येच त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोधी फाउंडेशन या संस्थेने “एक वही एक पेन” हा उपक्रम गेली चार वर्षापासून वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच साजरा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील साधुसंत समाज सुधारक यांचे चरित्र पुस्तिका लहान मुलांना बाल संस्कारासाठी प्रदान करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधान प्रस्ताविकेचे मूळ इंग्रजी भाषेमध्ये मध्ये जशी आहे तशी प्रकट केली ही बाब जिल्हा परिषद शाळेमध्ये विशेष ठरली या कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटप करून करण्यात आले यावेळी बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.विकास मस्के प्राध्यापक दीपक म्होप्रेकर ॲड. किशोर जाधव ,सचिन झिमरे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रश्मी कांबळे मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले विचार मांडले तसेच माळी मॅडम व मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले

