मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधीविजय बगाडे
दौंड:- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रचंड लढा दिला,ब्रिटिश सरकार मधील व्हायस राय मंत्री मंडळात जल,बांधकाम,मजूर मंत्री असताना हिराकुड,सतलज, भाक्रा नांनगल नद्यांवर प्रचंड मोठी धरणे बांधून शेतीसाठी सिंचन व्यवस्था केली ,त्याच बरोबर धरणावर जलविद्धुत प्रकल्प बांधून सर्वत्र वीज पुरवठा केला.नदी जोड प्रकल्प करण्याचा त्याचा माणसं होता.असे मूलभूत शेती व्यवस्था त्यांनी केली.मजूर मंत्री म्हणून १८ या ऐवजी मजुरांचे कामाचे तास ८ केले,साप्ताहिक सुट्टी दिली,कामगार विमा योजना, स्री पुरुष समान वेतन ,बोनस योजना कामगार संघटनाना मान्यता अनेक अशा योजना आणून कामगारांचे हित केले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल आणून स्री याना समान हक्क अधिकार दिले.हे त्याचे कार्यकर्तृत्व जगात श्रेष्ठ आहे.असे विचार बी.वाय. जगताप संविधान स्मारक दौंड येथे मांडले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ६९ वा स्मृती दिना निमित्त संविधान स्मारक स्थंभ येथे बोलत होते,दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड शहर अध्यक्ष गुरुमुख नारंग यांनी स्मारकास व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतीमेस पुष्पहार अर्पण केला,धम्म वंदना झाली.समता सैनिकांनी मानवंदना दिली,कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा ,बुध्दी स्ट नालंदा बहुउद्देशीय संस्था सदस्य विश्वशान्ति बुध्द विहार पाटस,राजगृह बुध्द विहार या संस्था सामील झाल्या.कार्यक्रमास सोहेल खान, मा.दीपक सोनवणे, उत्तम सोनवणे,जॉन फिलिप,विलास कदम दिलीप आढाव,विजयकुमार गायकवाड,सूर्यकांत जानराव,उमेश जगदाळे,निखिल स्वामी,सैदप्पा गायकवाड,गोरख घोडके,दादा मोरे,पिंटू डाळिंबे,दत्तात्रय कोकाटे,सुधीर पानसरे,प्रशांत पानसरे,राजेश मंथने,गायकवाड,राजू गायकवाड,सदाशिव रणदिवे,. भोसले,श्रीकांत साळवे,हरी काळे,श्रीधर बाळे कुंद्री,..कांबळे,राजू जाधव,…..इत्यादी मान्यवर हजर होते.सुरवातीस महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व मानवंदना झाली.असाच कार्यक्रम नालंदा बुद्धविहार भो ईटेनगर,संविधान चौक सरपंच वस्ती येथे झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड तालुका दौंड शहर शाखा,संविधान स्मारक समिती,भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर व तालुका बुध्दीस्ट नालंदा बहुउद्देशीय संस्था यांचे सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

