Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रकवी समाधान लोणकर यांची आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल, पुणे संमेलन अध्यक्ष म्हणून निवड

कवी समाधान लोणकर यांची आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल, पुणे संमेलन अध्यक्ष म्हणून निवड

वसमत प्रतिनिधी मिलिंद आळणे

पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात दि.02 ते 05 जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल या काव्य महोत्सव कार्यक्रमातील भव्य विचारमंचावर कविता सादर करण्यासाठी खाकी वर्दीतले कवी समाधान दिनकर लोणकर यांच्या कवितेची निवड झाली आहे.

कवी समाधान लोणकर हे राहोली (बु), ता.जि.हिंगोली चे रहिवाशी असून त्यांना साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महामानवांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ते करत आहेत.आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल या काव्य महोत्सवाची सुरुवात 2025 गतवर्षी फुलेप्रेमी, संविधान दूत मा. विजय वडवेराव यांनी केली. विशेष म्हणजे हा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल व काव्य महोत्सव निशुल्क असतो. जानेवारी 2026 हे काव्य महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे या महोत्सवामध्ये कवी समाधान लोणकर यांना निमंत्रण मिळाले आहे.

तसेच कवी समाधान लोणकर हे काव्य सादरीकरणाबरोबरच विचारमंचावर अध्यक्ष पदही भूषवणार आहेत. याबाबत आयोजक संविधान दूत मा.विजय वडवेराव यांनी तसे निवडपत्र दिले आहे. या निवडीबाबत कवी समाधान लोणकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments