Thursday, February 26, 2026
Homeदौंडआंबेडकरी चळवळ भैय्यासाहेब यांनी गतिमान केली. ...

आंबेडकरी चळवळ भैय्यासाहेब यांनी गतिमान केली. – प्रा. डॉ.भीमराव मोरे

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड,दि.१२: दौंड भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर व नालंदा उध्देसीय प्रतिष्ठान यांच्या वतीने सुर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाना नंतर दीन दुबळ्या समाजाला मानसिक आधार देऊन डॉ.बाबासाहेब यांचे कार्य पुढे नेण्याचे काम सुर्यपुत्र भैया साहेब आंबेडकर यांनी केले असे विचार प्रा.डॉ.भीमराव मोरे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर यांनी भोईटे नगर दौंड येथे व्यक्त केले. चैत्य भूमी निर्माण कार्य,कफ परेड मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महाड मधील स्मारक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन दादर,दीक्षाभूमी नागपूर या स्मारकांची निर्मिती व भारतीय बौद्ध महासभा कार्य संपुर्ण भारतात त्यांनी पोहचविले असे पुढे ते म्हणाले.

भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा व बुद्धीस्ट नालंदा बहु उद्धेसीय प्रतिष्ठाण यांचे वतीने भैया साहेब आंबेडकर यांच्यि १३१ व्यां जयंतीचे नियोजन केले होते,धम्म वंदना श्रीधर बाळे कूंद्री यांनी घेतली,तर बी. वाय.जगताप यांनी भैयासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन प्रवास उलगडून सांगितला,या कार्यक्रमास,विजय कुमार गायकवाड,सूर्यकांत जानराव,सुरेश मोरे,अड.शीतल मोरे,किरण मोरे,श्रीयुत. तोरे, लक्ष्मीबाई मोरे,इत्यादी उपासक उपसीका हजर होत्या.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments