Thursday, February 26, 2026
Homeबुलढाणासामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ याच्याकडे मागण्यांचे वादळ

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ याच्याकडे मागण्यांचे वादळ

मागण्या मान्य करा अन्यथा व्यापक स्वरूपाचे आंदोलन करणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवारांचा इशारा

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे आज दि.02.11.2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका अभ्यासिकेचा उद्घाटन करण्यासाठी येत असल्याची चर्चा आहे, बुलढाण्यात जिल्ह्यामध्ये सतत होत असलेल्या अत्याचाराच्या घटना यांचा गांभीर्याने विचार करून , ज्या गावात घटना घडलेल्या आहेत त्यांना न्याय देण्यात यावा. आणि संबंधित अधिकाऱ्यांना आपण चौकशीचे आदेश द्यावे. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. सामाजिक न्याय विभागा हा न्यायचा विभाग असताना अन्याय होतांना दिसत आहे .विविध मागण्यांसाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर दबाव वाढत आहे . मागण्यांमध्ये घरकुलाचा निधी वाढवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवणे, स्वाधार शिष्यवृत्ती योजना सुधारणे, कामगारांना किमान वेतन देणे आणि बुलढाणा जिल्ह्यातील दलित कुटुंबांना न्याय देणे यांचा समावेश आहे.

घरकुल योजनेचा निधी प्रत्येक लाभार्थ्याला 10 लाख रुपये करण्यात यावा .आणि प्रत्येक सामाजिक न्याय भवन इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा. व डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शिष्यवृत्तीला लावलेले गैर कायदेशीर तांत्रिक निकष बंद करून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट स्वाधार योजना लागू करण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थी स्वाधार योजने पासून वंचित राहणार नाही.तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना कमी पगारामध्ये काम करावे लागत आहे .त्या मानधनांमध्ये त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही म्हणून कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार 28 हजार रुपये वेतन देण्यात यावे.

बुलढाणा जिल्ह्यातील दलित कुटुंबांना न्याय :द्या – सतीश पवार जिल्हाध्यक्ष भीम आर्मी

बुलढाणा जिल्ह्यातील वेणी, वढव उकळी, खामगाव, पेन टाकळी अशा अनेक गावांमधील दलित कुटुंबावर प्रस्थापितांकडून हल्ले करण्यात आले. त्या पीडित कुटुंबियांची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भेट घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी संबंधित तपास यंत्रणेला आदेशित करण्यात यावे.या मागण्यांचे निवेदन प्रसिद्धीप्रकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास भीम आर्मी चे जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात तीव्र , व व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .

- Advertisment -

Most Popular

Recent Comments