मूकनायक रिपोर्टर तानाजी राजवर्धन.
गारगोटी, दि.१९ : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर दक्षिण कार्यकारिणी नवनियुक्ती रविवार,दि.२३/११/२०२५ रोजी सकाळी अमरनाथ विद्यार्थी वसतिगृह गारगोटी, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर यां ठिकाणी होणार आहें. या नवनियुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभा चे केंद्रिय सचिव आयु. भिकाजी कांबळे साहेब आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. यु. जी. बोराडे साहेब तसेंच संस्थेचे प्रमुख केंद्रिय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा दक्षिण कार्यकारिणीची नवनियुक्ती निवड प्रक्रिया संस्थेच्या बायलॉज प्रमाणे पारदर्शक होणार असल्याची माहिती एक्स अभियंता महाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभाग, विद्यमान जिल्हा अध्यक्ष आयु. एस. व्ही. कांबळे तथा ऐनिकर यांनी दिली आहें.
जिल्हा शाखा कोल्हापूर दक्षिणचे राधानगरी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड व कागल यां सहा तालुक्यातील, ‘आंबेडकरवादी बौद्ध’ उपासक – उपासिका, श्रामणेर – बौद्धाचार्य, केंद्रिय शिक्षक- शिक्षिका, विद्यमान – माजी, ग्राम -शहर, तालुका – जिल्हा, समता सैनिक फ़ोर्स – समता सैनिक दल सर्वच आजी – माजी पदाधिकारी, नवयुवक – नवयुवती यांनी उद्धारकर्ते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मातृसंस्थेच्या कोल्हापूर जिल्हा दक्षिणच्या कार्यकारिणीमध्ये ‘जिल्हापदाधिकारी’ होऊन जनमाणसांत बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीची तन मन धनाने सद्धम्मसेवा इच्छिणाऱ्या सर्वांनीच वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन विद्यमान जिल्हाध्यक्ष आयु. एस. व्ही. ऐनिकर यांनी मूकनायक वार्ताहर यांचेशी बोलताना केले आहें.

