Thursday, February 26, 2026
Homeसंपादकीयसंविधान सन्मान महासभा

संविधान सन्मान महासभा

आज संविधान महासभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. वर्षानुवर्षे आपल्या बहुजन बांधवांना एका धर्माच्या चौकटीत बांधून आपल्या मानवी मूलभूत हक्क अधिकारांचा ज्या मनुस्मृतीने गळा घोटला. त्याचं धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांणी संविधानामार्फत हीन गणलेल्या स्त्रियांना आणि प्रत्येक जमातीला मानाचा सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाच्या मार्फत दिला. वर्षानुवर्षाची मानवी गुलामी तोंडणारा ह्या भारतीय संविधानाचा आज बाळासाहेब आंबेडकर ह्याच्या वंचित बहुजन आघाडीकडून अमृत महोत्सवी सभा आयोजित करण्यात आली आहे. आज संविधान असतांना सुद्धा आणि गोरगरिबांसाठी बनवलेल्या लोकांसाठी कायद्याची अंमलबजावणी प्रशासना मार्फत केली जातं नाही. ह्याला जबाबदार आजची सत्ताधारी धार्मिक राजकारणी पद्धती होय. त्यामुळे देशात अनेक अन्याय अत्याचार होतात परंतु न्याय काही लोकांनाच मिळतो त्याला जबाबदार आहे मानवी सत्तेचा लांपटपणा आणि स्वतःच्या मनमार्जीने मिळालेली सत्ता हाताळण्याचा स्वार्थीपणा.

बाबासाहेब आंबेडकर एकदा “संविधान तयार झाल्यानंतर म्हणाले होते, संविधान कितीही चांगलं असुदे पण जर त्याची अंमलबजावणी करणारा व्यक्ती सत्तेत बसला नसेल तर त्याचा उपयोग जनतेला कधीच होणार नाही आज तशीच परिस्थिती झाली आहे. कायदे लोकांसाठी जाणीवपूर्वक न लागु करून कायदा न्याय व्यवस्था आणि संविधानाविषयीं द्वेष निर्माण संभ्रम पसरवण्याचा काम काही धर्मांध विकृतीकडून केलं जातं. कधी बाबासाहेब आंबेडकर ह्याची विटंबना तर कधी त्यांच्या संविधान जंतर मंतर वर ब्राह्मणी वर्गकडून जाळलं जातं. पण तरी सुद्धा ज्या बहुजनांना हें भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी छ. शिवरायांच्या रायगडाच्या पायथ्याशी शपथ घेऊन निर्मिती केली आज त्याचं संविधानाच्या कायद्याची सध्या मोडतोड ब्राह्मणवादी (कालची मनुस्मृती वाद ) लोकांकडून होतं आहे हा धर्माच्या नावाने चाललेला लपंडावं लोकांनी लक्षात घेतला पाहिजे. महापुरुषांच्या जयंती, स्मृती दिनी सुद्धा दिवस आणि काही विचित्र गोष्टी त्याचं दिवशी आखून मूळ मुद्दा झाकण्याचं डाव सध्या चालु आहेत हें लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. आज देशात बहुजनांची सत्ता नाहीये आज देशात धनदाडगे आणि लुटारू ब्राह्मण वर्गाची सत्ता सद्या त्यांच्या हातात असल्यामुळे आधीच बहुजनांच्या न्यायव्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात आधीच द्वेष असल्यामुळे ते संविधानाबद्दल जेवढा लोकांच्या मनात कोरता किंवा गैरसमज पसरवता येईल ते त्यांचा अजेन्डा चालवत आहेत हा डाव जनतेने सावध गिरीने ओळखलं पाहिजे.

आज जर आपल्या गाफिल पणामुळे काही धर्मांध द्वेशी लोकांनी संविधान निर्मिती आणि त्याच्या मूलभूत कायद्याबद्दल जर तोडमोड केली बदल केला तर त्याला जबाबदार आपल्या जनतेचं गाफिलपणा असेल. कारण हें संविधान मनुच नाही तर आजचं संविधान हें स्वतंत्र असणाऱ्या नागरिकांच आहे जो पूर्वश्रमी मनुस्मृती च्या काळात धार्मिक तसेच जातीनुसार वाटून दिलेल्या कामानुसार बांधलेला होता जो अडानी होता ज्याला शिकण्याचा स्वतःच्या मनमार्जी नुसार नोकरीं, वधू, आणि बाहेर देश भ्रमंती असं धर्मानुसार कोणतंच अधिकार नव्हता ह्याचे पुरावे उपलब्ध आहेत. स्त्रियांची अवस्था तर फारच दयनीय होती. तिला शिकण्याची संधी तर सोडाच तिला धार्मिक ग्रंथानुसार उपभोग घेण्याची साधनच समजली जायची जी फक्त चूल आणि मुलं ह्या संज्ञेतच अडकली होती. अनेक सती, केशप्पन, आश्वामेध, स्त्री शुद्धी, देवदासी अशा अनेक गुलामी युक्त बंधनातून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून हिंदू कोड बिलं लागु करून तिला कायदेशीर मुक्त जीवन जगण्याचे आणि आकाशी भरारी घेण्याचे कायदे संविधानिक कायद्याने शेवटपर्यंत बहाल केले. आज त्याचं संविधानाचा अमृत महोत्सव आहे. जो आपल्या मानवी हक्क अधिकाराचे प्रतिनिधित्व करतं. परंतू देशात ब्राह्मणवादी ताकदीने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कधी बी. एन. राव ह्यांना संविधान निर्माता आहे असे सांगून खोटी माहिती पुस्तकं लोकांमध्ये प्रिंट करून वाटतं आहेत तर कधी संविधानच चुकीचं आहे असे अफ़वा नेहमी पसरवत राहतील आणि कायदा सुव्यवस्था बिघडवत राहतील. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या हजारो वर्षाची मानवी गुलामी एका फटक्यात कायदेशीर प्रक्रियेने संपवली आणि ब्राह्मणी वर्गाची धार्मिक गुलामगिरी संपवली हा राग ब्राह्मणवादी वर्गाच्या मनात असल्याने आज संविधान असतांना त्यांची लुटारू पणाची सर्व मनमानी त्यांना लोकांवर पाहिलेसारखी दक्षिणा वगैरे पूर्णपणे राबवता येत नाही त्यामुळे ह्या सर्व धार्मिक गोष्टींच्या आड येणाऱ्या संविधानाचा लिहिणारा निर्माताच आणि हें संविधानच चुकीचं ठरवून नंतर आपला डाव साधायचा ह्या नियोजनासाठी ब्राह्मणी वर्ग प्रयत्नात आहे. ज्यात अनिल मिश्रा सारखा व्यक्ती आघाडीवर आहे त्यामुळे संविधान ब्राह्मणांनी निर्माण नाही केलं तर हें संविधान छ.शिवरायांच्या रायगडीसाक्षीने बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या न्याय हक्क अधिकार जपण्यासाठी निर्माण केलं आहे. त्यामुळे आपल्या छोटया छोटया गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाही हें लक्षात घ्या.कारण एकदा जर परिस्थिती बिघडली आणि ह्या संविधान कायद्याची मोडतोड झाली ती होतेच आहे. जे सत्ताधाऱ्या नच्या निवडणुकीतल्या वागणुकीवरून दिसतं. त्यामुळे दक्ष नागरिकांरिकांनी धार्मिक लपंडावापेक्षा आपल्या आयुष्यभराच आणि मुलांच्या भविष्याचा रक्षण करणाऱ्या संविधानाचे रक्षण मरेपर्यंत केले पाहिजे. नाहीतर गाफिल राहिलात तर मागच्या काळातली गुलामी यायला वेळ लागणार नाही आणि आलीच तर ती परिस्थिती सुधारायला आणि गुलामी संपवायला छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुल्यांसारखी माणसे पुन्हा जन्माला येणार नाहीत हें लक्षात ठेवा.

त्यामुळे आज संविधानाच्या जनजागृती साठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर आज संविधानाच्या होणाऱ्या कायद्याची पायमल्ली आणि धोका ह्यावर मार्गदर्शन करणार आहेत जे ह्या देशासाठी ते एक कायदेतज्ज्ञ म्हणुन महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आजची सभा बहुजन वर्गासाठी महत्वाची आहे. काही मीडिया चॅनेल वाले हीं सभा जाणीवपूर्वक दाखवणार नाहीत परंतु सभेचा विषय प्रत्येक नागरिकांनी समजून घेतला पाहिजे……संविधान सभा आज संद्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर मुंबई येथे

सप्रेम जय संविधान पत्रकार मूकनायक ठाणे जिल्हा ब्युरो चीफ राजरत्न जाधव ✍️ बातम्यांसाठी आणि मूकनायक चे वार्षिक सभासद वाचक(550 रू) होण्यासाठी संपर्क.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments