अग्रलेख
आता गावाचा विकास असुदे की जिल्ह्याचा की राज्याचा धर्माच्या नावाने मत मागणाऱ्या लोकांची घरातून सरळ हकालपट्टी करा. कारण निवडणुका आल्या की धर्माचे बोंबारे खूप वाजतात. आता हीं देशभक्ती आमच्या सारख्या जागृत युवकांना नक्कीच कळून आलीय. देशाचे गद्दार इथे एवढे झालेत की निवडणुका जिंकण्यासाठी वेळ आल्यावर माणसांचा सुद्धा सहज बळी देतील ह्यात तिळमात्र शंका नाही. परंतु लोकांनी कायदा सुव्यवस्था बिघडवून कोणतीही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करू नये. आज तुम्हाला न्याय देणाऱ्या आणि तुमच्या हक्क अधिकारांचे रक्षण रक्षण करणाऱ्या योग्य व्यक्तीची निवड तुम्हाला ह्या निवडणुकीत करायची आहे. देशात आराजक्ता माजवून लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल आणि लोकांचे लक्ष विचलित करून राजकीय षडयंत्र कसे यशस्वी करता येतील ह्यावर लबाड सत्ताधाऱ्यांचे डाव आखने चालू आहेत.हे ओळखणे लोकांनी गरजेचे आहे. लोकांना भावनिक करून संधी साधण्याचे प्रकार मागील बऱ्याच वर्षांपासून राजकीय पटलावर चालू असतात. जनतेने ह्यावेळी सतर्क राहूनच आपल्या भविष्याच्या राजकीय हक्क अधिकाराचा निर्णय घेतला पाहिजे. देशात सध्या काही धर्म गद्दार वादी आणि कट्टरतावादी लोकांनी आपल्या मांड्या आपटायला सुरुवात केलीय पण एक गोष्ट नक्कीच सांगेन जेव्हा राजकारण करत असतांना धर्म आडवा येतो त्यावेळेला विकासासाठी मार्गच शिल्लक राहत नाही. शोध पत्रकारिता करत असतांना बऱ्याच गोष्टी आढळून येतात की जी लोकं धर्माच्या नावाने दुसऱ्यांना बोंबलत फिरतात त्यांनी कधी आपल्यातले काही गद्दार जेव्हा पाकिस्तान सारख्या देशाला आपल्याच हिंदू लोकांकडून खबरी पुरवण्याचे काम करत होते त्यावेळेस सगळ्या गुप्त egency काय करत होत्या हा सर्वात महत्वाचा प्रश्न? असंख्य नावांची नोंद आहे. ज्यात पाकिस्तान बद्दल हेरगिरी करत असतांना पकडले गेले. दोन हिंदू युवक शोभीत कुमार आणि विजेंद्र सिंग हे RDX सहित कार बरोबर पकडले गेले.पण बातम्या मध्ये अशा बातम्या का लोकांना दाखवल्या नाहीत. आपली लोकं चुकतात त्या चुका सुधारण्यांऐवजी आपण ह्यावर काय बदल करू शकतो ह्यावर विचारमंथन करायची मानसिकता नाही का? आपणच आपल्या देशात संविधानाची पायमाल्ली करतो तर बाहेरच्यांकडून काय अपेक्षा करणार. आपल्याकडे गद्दार तर इथे प्रत्येक धर्मात आहेत पण काहीची गद्दारी पकडली जाते आणि काही कायद्यासोबत आपल्या धर्माचा सांगून वाचवण्याचा प्रयत्न करतात. गुन्हा कोणताही असो.. त्याला लोकांनी समर्थन केले नाही पाहिजे हा विचार करण्यासाठी मानवी बुद्धी दिलीय निसर्गाने. असे असतांना जर तुम्हाला औषधं शोधता येत नसेल जे ह्यावर औषधं बनवतील त्यांना सत्तेत बसवा. दरवेळेस विकासाचा प्रश्नावर कुणी बोलणार नाही. आणि कुणी बोलला की मधेच कुठेतरी वेगळ्या धार्मिक किंवा वादविवादास्पद पोस्ट टाकून लोकांच्या भावना भडकवायच्या हेच कार्यक्रम सध्या चालू आहेत. त्यादिवशी पनवेल चे शिवसेना कार्यकते ह्यांच्या वॉल वर पोस्ट पाहिली की 12 वर्षाच्या मुलीवर आपल्याच 20 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला. अशा कितीतरी शोषणाच्या केसेस आहेत. कुठे आहेत आपल्या संघटना.बरं त्यात असा हीं उल्लेख आहे की कंमेंट्स करणाऱ्या आपल्याच लोकांमधून काही लोकं अशी विधाने करतात की बिहारीं असला तरी तो आपलाच आहे… अरे वा.. हीं कोणती विचारधारा.. तुम्ही समाजाला दिशा देताय की विस्तीर्ण दशा करताय? आणि कोणत्या अहंकाराने…हल्ली देशात निवडणुकीच्या तोंडावर अजून एक प्रकार खूप घडतो अलीकडच्या काळात गोमान्स प्रकरण आता ह्या प्रकारणविषयी बोलायचं झाल्यास उत्तर प्रदेश सारख्या राज्यात बऱ्याच श्या गोमान्स कंपन्यांकडून हजारो टन गोमान्स बाहेर देशात निर्यात केला जातो मग हीं साखळी कोण चालवतो? मग सरकार आतापर्यंत सत्तेत असतांना गप्प का? आणि मध्यंतरी ब्राह्मण पंडित पुरन जोशी ह्या माणसाच्या कोल्ड स्टोरेज मधून 200 टन गोमान्स पकडण्यात आलं. त्याच्यावर काय कार्यवाही केली हीं बातमी इथल्या मीडियाने दाखवली का? की आपलीच मोरी आणि मुतण्याची चोरी अशी अवस्था म्हणावी लागेल का? जसा इतर मुद्याना राजकीय खतपाणी दिले जाते तसें ह्यावर इथले देशवीर भूमिपुत्र क्रांतिकारी गप्पं का? तेव्हा ह्यांची देशभक्ती कुठे जाते? दिवसरात्र जाती जाती धर्मा धर्माच्या नावाने अन्याय अत्याचार, बलात्कार, शोषण केलं जातं तेव्हा असं वाटतं नाही की आपल्याच मध्ये ज्या समस्या निर्माण आपणच केल्यात त्या संपुष्टात आणूनच देशाची समाजाची सुसंस्कृत बांधणी होईल. बाहेरच्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या घरात आपण काय नुकसान करतोय का आणि कशासाठी ह्यावर जेव्हा प्रश्न पडेल तेव्हाच इथल्या सत्ताधारी, आणि सामान्य भावनिक होणाऱ्या जनमाणसाला कळून चुकेल की आपल्याच धर्मात असण्याऱ्या गद्दा्रांमुळे हीं परिस्थिती निर्माण झाली आहे.आणि गद्दार कुणीही असो त्याला माफी करण्याचं काहीच कारण नाही. पण सत्तेत आपणच आपली माणसं आहोत मग त्यांना कोण क्लीन चिट देतं हा सुद्धा महत्वाचा प्रश्न!देशात धर्माच्या नावाने आराजक्ता माजावणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे. पण जाणीवपूर्वक एकाला वाचवायचं आणि दुसऱ्याला शिक्षा करायची हीं कोणती पद्धत. तर हे राजकीय गडबडीचे कारण आहे तर्क संगत मुळीच नाही, आणि बुद्धीला न पटण्यासारखं आहे. जो दोषी आहे तो दोशीच आहे हे धोरण इथल्या सरकारांच असायला हवं. पण ह्यांना कायद्यापेक्षा स्वतःच वयक्तिक राबावण्यात जास्तच फायदेशीर वाटतात. त्यासाठी मी काही दिवसात ऐतिहासिक शोध प्रबंध नक्कीच लिहिणार आहे. आणि लिहावं लागेल कारण आपण आपल्याच शिस्तीची मोडतोड करतोय तर बाहेरून आलेली माणसं फायदा का नाही घेणार?….वेळोवेळी मी काही असं काही लिहीनार नाही प्रत्येक माणसाकडे मेंदू आहे त्याने सत्य आणि असत्य ह्यावर सपशेल निर्णय घेऊ नये त्यावर संशोधन केले पाहिजे. खरंतर लिहिणार नव्हतोच आणि पण मी संविधानाला मानणारा व्यक्ती आहे त्यामुळे कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु जसे घरात योग्य आणि शिस्त बद्द व्यक्ती नसेल तर अक्ख घर वाया जातं त्याप्रमाणे जर सत्तेतली माणसे चुकीची असली की ते घरच नाही तर पूर्ण देशात बेशिस्त पणा राबवायला मागे पुढे पाहत नाहीत. तसंच आजकाल झालं आहे….. कुणाला सत्य पचवता येत नाही मात्र अहंकार सहज पचवला जातो. त्यामुळे देशात सुव्यवस्था नांदवायची असेल तर शिस्त बद्ध आणि न्यायी व्यक्तीची निवड करावी लागेल. जो निष्पक्ष न्याय भूमिका घेईल. लबाड लोकांना जर आपलेच सगे सोयरे, जवळचे, मित्र असे मानत जर पुढे कराल तर त्याला माझ्या भाषेत त्याला स्वार्थ बुद्धी च म्हणेन. आणि आपले प्रत्येकाचे भविष्य असेच गोड बोलून स्वार्थी लोकं लाटून टाकतील. म्हणुन लोकांनी जागे झाले पाहिजेत. पण धर्माच्या नावाने नव्हे तर माणूस म्हणुन आणि जो त्या मानवी मूल्यांच्या विरोधात जाईल त्याला शासन करण्यासाठी एक जागृत व्यक्ती म्हणून पुढे आले पाहिजे. देशहितासाठी!आणि हे जर तुमच्यात होत नसेल एक दिवस सर्व भारतीय धन दांडगा्यांचे आणि धर्मांध मातांब्बारांचे गुलाम बनून मराल.कायदा – संविधानाला पायदळी तुडवणाऱ्यांना झोडा सगळं बरोबर शिस्तबद्धा होईल. नियम तोडणारा सामान्य नागरिक असेल किंवा सरकारी कर्मचारी अथवा कुणी जनतेचा सेवक मंत्री ह्या सर्वावर लोकशाही कायद्याचा चाप ठेवा. हे तेव्हाच घडेल जेव्हा देशाप्रति, इथल्या मानवतेप्रति तुमची विचार धारा समतावादी, न्यायी, आणि शिस्तबाद्ध असेल.वाचून शांत बसा नाहीतर- विद्रोह करा अन्यायाविरुद्ध!हे तुमच्या वैचारिक पातळीवरच अवलंबून आहे.
✍️ राजरत्न जाधव ठाणे जिल्हा ब्युरो चीफ 📞 8010786682

