Thursday, February 26, 2026
Homeदौंडप्रत्येकाने संविधान साक्षर होणे काळाची गरज . शिक्षण अधिकारी बी.वाय.जगताप .

प्रत्येकाने संविधान साक्षर होणे काळाची गरज . शिक्षण अधिकारी बी.वाय.जगताप .

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड: दिनांक २६ : भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ असे संविधान आहे.सुमारे १४० कोटी जनतेचा विकास त्या मध्ये दडलेला आहे.प्रत्येक भारतीय नगरिकाने संविधान साक्षर झाले पाहिजे, असे विचार बी. वाय.जगताप माजी शिक्षण अधिकारी दौंड यांनी संविधान स्मारक स्तभ दौंड येथे व्यक्त केले.ज्ञान संकल्प सामाजिक संस्था दौंड व सांविधन स्मारक समितीचे वतीने राष्ट्र संत गाडगे महाराज चौकातील स्मारकात हा कार्यक्रम झाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून धम्म वंदना घेण्यात आली व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान स्तभास अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधान’ या विषयावर बी. वाय जगताप माजी शिक्षण अधिकारी यांनी विचार मांडले कार्यक्रमाला दीपक सोनवणे,सदाशिव रणदिवे आबा वाघमारे ,निखिल स्वामी,संजय सोनवणे,मुकेश गायकवाड,गंगाराम सुद्रिकपाटील, मनीष परकाळे, इ.मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर मंगेश मेमोरियल हायस्कूल,श्रीमती जिजामाता हायस्कूल गोपाळवाडी.जी.प. शाळा गोपाळवाडी ग्रामपंचायत गोपळवाडी,जी.प. शाळा गिरिम या शाळांमध्ये ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने बी. वाय जगतप सर संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे संस्थेचे दौंड तालुका अध्यक्ष समीर सय्यद तसेच संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ रोहिणी पवार यांनी संविधान प्रास्ताविक फ्रेम भेट दिल्या व,’ संविधान जागृतीचे महत्त्व, विद्यार्थी पालक व शिक्षक यांना संविधानाचे महत्त्व बी.वाय. जगताप यांनी समजाऊन सांगितले.या कार्यक्रमास प्रा.गिरीश सुरवाडे,संजय आढाव,गौतम कांबळे डॉ.दत्तात्रय जगताप, मुख्याध्यापक राजश्री बागल शिक्षक यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमास ज्ञांनसंकल्प सामाजिक संस्था राज्य सचिव सौ रोहिणी पवार दौंड ता.अध्यक्ष समीर सय्यद.हे हजार होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments