Thursday, February 26, 2026
Homeनांदेडनांदेडला हादरवणाऱ्या प्रकरणात 17 तासांच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल!

नांदेडला हादरवणाऱ्या प्रकरणात 17 तासांच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल!

दिनांक 16 नोव्हेंबर रोजी आपल्या बौद्ध समाजातील एका निरपराध भगिनीवर वारंवार बलात्कार, लूट आणि निर्दयी हत्या झाली.हा प्रकार केवळ गुन्हा नाही तर जातीय द्वेषातून केलेला भयानक अत्याचार आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीपासूनच टाळाटाळ केली –पोस्टमार्टम घाईघाईने करण्याचा प्रयत्न, पंचनामा न करणे, FIR नोंदवायला नकार…हॉस्पिटलमधील अनागोंदी कारभार…या सगळ्यामुळे पीडित कुटुंब आणि सर्व समाज संतप्त झाला.

माझी ठाम भूमिका – “गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी आणि कुटुंबीय पोलीस स्टेशन सोडणार नाही!”मी स्वतः, जिल्हाध्यक्ष म्हणून,16–17 तास सतत ग्रामीण पोलीस स्टेशन, सिडको येथे उपस्थित राहूनगुन्हा दाखल करण्यासाठी ठाम भूमिका घेतली.पीडित कुटुंबाची मागणी स्पष्ट होती :– योग्य FIR– व्हिडिओग्राफीसह, दोन डॉक्टरांनी पोस्टमार्टम– मॅजिस्ट्रेट इनक्वेस्ट– घटनास्थळ सील करून FSL तपासजोपर्यंत हे मान्य होत नाही,तोपर्यंत प्रेत स्वीकारायचे नाही – ही कुटुंबाची आणि आमची भूमिका ठाम होती.

आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली थेट दिशा या प्रकरणाची माहिती मिळताचराष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी थेट मार्गदर्शन केलेआणि मुलीचे री-पोस्टमार्टम घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे करण्याचे निर्देश दिले.त्यामुळेच पोलिसांना तातडीने प्रक्रिया बदलावी लागली.बहुजन नेतृत्वाची ताकद अशा वेळीच दिसते.संघर्षाला अखेर यश — रात्री उशिरा FIR दाखल!दीर्घ संघर्षानंतररात्री उशिरा FIR दाखल झाली —अॅट्रॉसिटी अॅक्ट व सर्व गंभीर कलमांसह.ही समाजाच्या एकजुटीची जिंक झाली आहे.शेकडो महिला, तरुण, कार्यकर्त्यांनी दाखवलेले संघटन — सलाम!दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो लोक उभे राहिले.कुणी एक पाऊल मागे हटले नाही.उपस्थित असलेल्या सर्व महिला, तरुण, नातेवाईक —आपल्या संघर्षामुळेच न्यायाचा दरवाजा उघडला.

आज सिद्ध झाले —एकजूट असेल तर न्याय मिळतो!संघर्ष असेल तर प्रशासन झुकते!** समाजाला माझा संदेश* दलालांपासून सावध राहा* चमचेगिरीपासून दूर रहा* संघटन मजबूत ठेवा* अन्यायाविरुद्ध निडरपणे उभे राहाही लढाई फक्त एका मुलीसाठी नाही,हा बहुजन स्वाभिमानाचा प्रश्न आहे.आणि मी माझ्या समाजासाठी सदैव निडरपणे उभा राहीन —काहीही परिस्थिती असो.वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड जिल्हा च्या वतीने जाहीर निषेध

- Advertisment -

Most Popular

Recent Comments