दौंड:-दि.२०: शिगाल सुत्तात भगवान बुध्द सर्व मानवतेची सेवा करा असा उपदेश देतात.त्यांचे कुशल मंगल पहा असे सांगतात.आज जागतिक पुरुष दीन आहे. घरातील पित्याचे स्थान हे निसर्गातील बलाढ्य अशा वटवृक्षा प्रमाणे आहे.जो वृक्ष सर्व प्राणी मात्राणा आधार,निवारा, सावली देतो.म्हणून दरेक मनुष्याने आपल्या पित्याला जपा. असे विचार बी. वाय. जगताप माजी शिक्षण अधिकारी यांनी बोरावके नगर ,दौंड येथे व्यक्त केले. भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर व नालंदा बुद्धविहार समितीचे वतीने जागतिक पिता दीन व काल कथित कृष्णा नामदेव काळे यांचे २८ व्या स्मृती स्मरणार्थ झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी विजयकुमार गायकवाड होते,समुचीत विषयावर श्रीधर बाळे कुंदरी,कैलास जगताप,राहुल आढाव यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला हरी कृष्णा काळे परिवार,जयराम सोनवणे,सदाशिव रणदिवे,के.के.खंडीझड, कांबळे, निकाळजे,सूर्यकांत कांबळे,इत्यादी सह अनेक मान्यवर हजार होते.

