Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्याआगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १७ मधुन सौ. सुप्रिया भरत वाल्हेकर यांना वाल्हेकरवाडी...

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग १७ मधुन सौ. सुप्रिया भरत वाल्हेकर यांना वाल्हेकरवाडी ग्रामस्थांचा एकमताने जाहीर पाठींबा.

प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे मूकनायक पिंपरी चिंचवड दि. २५ नोव्हेंबर २०२५ काल वाल्हेकरवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या वाल्हेकरवाडी ग्रामस्थांच्या बैठकी मध्ये शिवस्मारक , स्मशानभूमी, दवाखाना , नदीसुधार या चार मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांपैकी श्री. भरत शंकर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा कार्यक्रम सूरू केला. वरील चार मुद्द्यांसंदर्भात आत्तापर्यंत केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे त्यांनी ग्रामस्थांसमोर सादर केली. त्यावर ग्रामस्थांनी सदर चार मुद्द्यांवर सकारात्मक भूमिकेतून चर्चा करून आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा करत असता प्रगतशील शेतकरी विठ्ठल तरूण मंडळाचे अध्यक्ष नथुशेठ मारूती वाल्हेकर यांनी साधारण तीस हजार मतदार ( प्रभागाच्या एकूण 50 टक्के ) असलेल्या वाल्हेकरवाडी परिसरातून सुप्रिया भरत वाल्हेकर यांना निवडून आणण्याची सूचना मांडली. त्यावर सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून संमती दिली. चर्चेनंतर सर्व ग्रामस्थांनी सुप्रिया वाल्हेकर यांना सर्वसाधारण महिला गटातून आपला उमेदवार म्हणून जाहीर केले .
तत्पूर्वी मिटींग सूरू होण्या आधी ग्रामस्थांना विचारले असता सुप्रिया वाल्हेकर यांचे आत्तापर्यंतचे काम पाहता त्या सहज निवडून येतील अशी चर्चा होती. काही ग्रामस्थांनी सुप्रिया वाल्हेकर यांनी गेल्या चार-पाच वर्षातील केलेल्या समाजकार्याची माहिती दिली. त्यामध्ये नवरात्र उत्सव, स्वस्तथाळी योजना, रोजगार मेळावे, शिलाई मशीन व कम्प्युटर क्लासचे मोफत प्रशिक्षण यासारखे अनेक उपक्रम सुप्रिया वाल्हेकर यांच्याकडून होत असलेले सांगितले.
या गोष्टींचा विचार करून वाल्हेकर वाडी ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या भविष्यासाठी सुप्रिया भरत वाल्हेकर यांची आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १७ सर्वसाधारण महिला गटातून उमेदवार म्हणून एकमताने निवड केली त्याचप्रमाणे सर्वसाधारण गटातून शुभम वाल्हेकर व अनुसूचित जाती महिला गटातून सौ. भाग्यश्री अक्षय चव्हाण व सौ. पुष्पाताई शंकर झोंबाडे यांच्या नावाची चर्चा होती. सदर बैठकी साठी संपुर्ण वाल्हेकर वाडी परिसरातून शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ जमले होते तसेच मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या.
सदर बैठकीचे आयोजन वाल्हेकरवाडी ग्रामस्थांकडून यशस्वीरीत्या पार पडले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments