Thursday, February 26, 2026
Homeदौंडविश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म मानवता शिकवतो. ...

विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म मानवता शिकवतो. बी. वाय.जगताप (माजी गट शिक्षण अधिकारी)

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी

विजय बगाडे दौंड,:- दिनांक १४ ऑक्टोंबर २०२५ विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांनी माणसाच्या सुखा साठी,त्याने नीतिमान बनावे,विज्ञानवादी बनावे,पंचशिलेच्या आचरणाने चागला माणूस बनावे,दरेकाने समता,बंधुता व करुणा मैत्रीच्या मार्गाने जाऊन सकल मानवांचे कल्याण साधावे असे सांगतात. याच साठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास बौद्ध धम्म दिला असे विचार माजी गट शिक्षण अधिकारी बी. वाय. जगताप यांनी दौंड येथे व्यक्त केले.

भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा व नालंदा बुद्ध विहार समिती दौंड यांचे वतीने श्रीनिवास सोसायटी नगरमोरी दौंड येथे १३ वा वर्षावास कार्यक्रम व वर्षावास समारोप समारंभ प्रसंगी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती: या विषयावर ते बोलत होते.अध्यक्ष स्थानी विजयकुमार गायकवाड संघटक हे होते.धम्म वंदना व सूत्त पठण आयु.श्रीधर बाळे कुद्री यांनी घेतले.समुचित विषयावर आयु.श्रीकृष्ण मोरे केंद्रीय शिक्षक,विजयकुमार गायकवाड यांनी विचार व्यक्त केले. आभार प्रदर्शन माजी तहसीलदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला हरिभाऊ काळे,सैदपा गायकवाड, आर्.के.शिवशरण,जयराम सोनवणे,धनंजय गरुड,संघमित्रा शिंदे,अनिल थोरात, प्राजक्ता शिंदे,सुजाता शिंदे,आंशिक थोरात,प्रतीक शिंदे,अरुण कांबळे,इत्यादी उपासक उपसिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाच्या या ठिकाणी संघमित्रा शिंदे उपस्थित होत्या व त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस देखिल होता. सर्व उपस्थितांनी संघमित्रा यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments