Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रमैत्री भावना सर्व श्रेष्ठ सुखाची जननी आहे . डॉ आदिनाथ इंगोले

मैत्री भावना सर्व श्रेष्ठ सुखाची जननी आहे . डॉ आदिनाथ इंगोले

वसमत प्रतिनिधी मिलिंद आळणे

वसमत : तथगात गौतम बुद्धांनी शिकविलेली मैत्री भावना बंधुतेपेक्षा श्रेष्ठ आहे . मानवा मानवात सुसंवाद आणि सलोखा निर्माण करण्यासाठी ही मैत्री भावना सर्व सुखाची जननी आहे . मानवा सोबतच सर्व प्राणी मात्रांनी या भावनेचा अंगीकार करावा . असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आसेगाव काॅर्नर, वसमत येथे आषाढी पौर्णिमेपासून सुरु असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म”, क्रांती आणि प्रतिक्रांती,”बुद्ध आणि कार्ल मार्क्स”या मौलिक ग्रंथांचे वाचन व विश्लेषण कार्यक्रमाचा समारोप दि :०७ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. त्यावेळी उपासक , उपासिका यांना मार्गदर्शन करताना डॉ इंगोले बोलत होते .भन्ते पि.धम्मानंद यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील , बुद्ध वंदना देवून धम्म देशना दिली . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बालाजी मोरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ आदिनाथ इंगोले , डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे यशवंतराव उबारे , शहर अध्यक्ष मेजर भगवान सुर्यतळ आदी मान्यवर धम्म पीठावर उपस्थित होते . गेल्या तीन महिण्या पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करणारे आंबेडकरी विचारवंत सुनील काळे यांनी ग्रंथाचे वाचन केल्याबदल भारतीय बौद्ध महासभा वसमत शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक मेजर भगवानराव सुर्यतळ यांनी केले., सुनील काळे आणि भगवानराव सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन अंबादास इंगोले यांनी केले.आभार आर.एस.नंद यांनी मानले.डॉ एन के मुळे,बौद्धाचार्य दौलतराव गजभार, विजयकुमार एंगडे, साहेबराव सरोदे , राजकुमार एंगडे,यादव चौरे,के.पि.पंडित, रघुपती सरोदे, अनिल पंडित, गौतम ढेंबरे, वसंत खिल्लारे ,आनंद वाहेवळ , आकाश दातार, नागसेन कांबळे मिलिद आळणे यांच्या सह शहरी व ग्रामीण भागातील बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते .भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले .

- Advertisment -

Most Popular

Recent Comments