बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र देशाच्या कान्या कोपऱ्यात पोहोचवले कारण बुद्धधम्म हा समता आणि शांती शिकवतो विषमतेला विरोध करतो सत्य, विज्ञान सांगते. ज्या ज्या देशाने बुद्धधम्म स्वीकारला त्या त्या देशामध्ये समता अमन, शांती असल्याचे प्रतिपादन डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा राज्य अध्यक्ष यांनी मोताळा येथील भव्य धम्म महोत्सव कार्यक्रमांमध्ये केले. ज्या भूमीने जगाला बुद्ध दिला तेथीलच आपण लोक मागे आहोत
याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे तसेच बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलनासाठी फार मोठा लढा उभारणार असल्याचे सुद्धा डॉ. आंबेडकर यांनी मत व्यक्त केले.
या भव्य धम्म महोत्सवाचे अध्यक्षस्थानी के. के. शेगोकार जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा हे होते. धम्मविचार मंचावरून यावेळी उदघाटक यू, जी. बोराडे राज्य अध्यक्ष, राज्य संघटक भीमराव तायडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. धम्म महोत्सव संकल्पना समाजभूषण
प्रशांत भाऊ वाघोदे यांची होती. भन्ते विनयाचार्य, भन्ते बी संघपाल यांनी धम्मदेशना दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्रीय शिक्षक डी. एस. वले यांनी केले
विचार मंचावर यावेळी प्रमुख्याने जेष्ठ विधीज्ञ ऍड. माणिकराव पवार, भीमराव जाधव, पी.बी. इंगोले, अतिशभाई खराटे, प्रशांतभाऊ वाघोदे, छायालाई बांगर, डॉ. अनिल वानखेडे विशाखाताई सावंग हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी. एन. सुरवाडे यांनी तर संघपाल अहिरे यांनी आभार प्रदर्शन केले. सुप्रसिद्ध गायक मेघानंद जाधव
औरंगाबाद यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, राजगृह बुद्ध विहार ते सभास्थानापर्यंत सचित्र धम्म
महोत्सव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, हजारोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमास हजर होते.

