मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे दौंड
दौंड- बीड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्टेशन ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्या गेले काही वर्षांपासून माजी सैनिक अनुरथ सोपानराव वीर यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे मागणी करण्यात येत आहे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे, महाराष्ट्र शासन आमच्या मागणीची गंभीर पणे दखल घेत नसल्याने माजी सैनिक अनुरथ सोपानराव वीर यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता,या बाबत स्वराज्य शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा प्रशांत विष्णू सोनवणे यांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार कडे बीड रेल्वे स्टेशन ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लवकरात लवकर देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा या मागणीचे निवेदन स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ करुणाजी धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येणार आहे असे प्रदेश सचिव मा प्रशांत सोनवणे यांनी मूकनायक चे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले

