Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड शहरात भरवस्तीमध्ये दरोडा घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

दौंड शहरात भरवस्तीमध्ये दरोडा घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

मूकनायक दौंड प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड- दौंड शहरातील भरवस्तीतील सहकार चौक येथे अतुल शंकर काळे यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे चांदीचे व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली अतुल शंकर काळे वय वर्षे 47 रा. बाळकृष्ण प्लाझा फ्लॅट नं.11 सहकार चौक पाटील हॉस्पिटल शेजारी येथील रहिवासी असून दिनांक 10/10/25 रोजी सकाळी 8:00 वाजता ते रात्री 12:15 वाजे दरम्यान त्यांच्या घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करुन 2,50,000 रुपये किंमतीचे 5 तोळे वजनाचे सोन्याची पट्टी डिझाईनचे गंठण 50,000 रुपये किंमतीचे 1 तोळे वजनाचे सोन्याची पट्टी डिझाईनचा नेकलेस 75,000 रुपये किंमतीचे 1.5 ग्राम वजनाचे मुलीची सोन्याची चैन त्यामध्ये नावाचे पेंडल त्याला डायमंड लावलेले 37,500 रुपये किंमतीचे 7.5 ग्राम वजनाचे मुलीचे सोन्याची चैन त्यामध्ये हार्ट शेफ असलेल्या पेंडलसहित 50,000 रुपये किंमतीचे सर्व मिळून 1 तोळे वजनाचे 4 कानातील (झुमका साखळी,सुइ दोरा,रिंगा,)( तीन नथ) एक अंगठी 25,000 रुपये किंमतीचे अंदाजे 500 ग्राम चांदीचे दागिने त्यामध्ये 3 पैंजण, 6 जोडवे, 1 चैन, 2 ब्रासलेट 2 कॉइन 1,500 रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये भारतीय चलनातील नोटा एकुण 4,89000/- रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला असल्याची तक्रार दौंड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस हवालदार राऊत यांनी दिली आहे पोलीस निरीक्षक गोपाळराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत

- Advertisment -

Most Popular

Recent Comments