चालतात माझी पाऊले आता तुझ्याच दिशेने,
होईल परीवर्तन माझे आज ना उद्या याच आशेने..
काळजालाही माझ्या हल्ली तुझीच ओढ असते,
तुझ्याच सहवासात माझी करूणा गोड हसते..
करूणा भरल्या डोळ्यात पहातो मला मी जेव्हा,
मैत्रीचा सुगंधी भाव फुलतो मनात माझ्या तेव्हा..
शोधतो मला मी एकांती माझ्या अंतरमनी,
नसतो मी कुठेच माझा माझाही नसतो कुणी..
तरीही चालतो मी पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर,
फेकले जरी किनारी स्वार पुन्हा त्याच लाटेवर..
विकास साळवे,पुणे
9822559924..✍️


