मुकनायक वसमत प्रतिनिधी मिलिंद आळणे
जवळा बाजार : रोशनी लोकसंचालित साधन केंद्र जी 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा साई नगर,साई मंदिर सभागृह जवळा बाजार येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आली या वार्षिक सर्वसाधारण सभे करिता उद्घाटक म्हणून आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक आदरणीय आणि इंगोले सर लाभले त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय बाळासाहेब झिंजाडे जिल्हा समन्वय अधिकारी हिंगोली हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून एचडीएफसी बँकेचे नयुम शेख ,पाईकराव सर जवळा बाजार चे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आदित्य भैया आहेर उपजीविका सल्लागार आदरणीय गजानन खीरोडकर सर, गोविंद कदम आयसीआयसीआय बँक तसेच आर सिटी च्या फॅकल्टी आदरणीय संगीता मुळे मॅडम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता सीएमआरसी अंतर्गत असलेल्या गटातील एकूण 1042 महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली संस्थेच्या अध्यक्षा सुनीताताई शेळके यांनी सर्वप्रथम आपले मनोगत व्यक्त केले यानंतर सीएमआरसी चे व्यवस्थापक श्री संकेत दोडल यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे लेखापाल तौफिक शेख यांनी मागील वर्षाचे ऑडिटचे वाचन केले तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते क्षितिजझेप या वार्षिक अहवालाचे विमोचन करण्यात आले सदर कार्यक्रमात मागील वर्षी मागील वर्षी जास्त कर्ज मिळालेल्या गटांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जी टी एम अंतर्गत शासनाच्या विविध योजना महिलांना सांगण्यात आल्या कार्यक्षेत्रातील व्यवसाय करणाऱ्या महिला तसेच व्यवसाय करणाऱ्या गटांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि इंगोले आयसीआयसीआय बँक व्यवस्थापक यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच कुठल्याही परिस्थितीत बचत गटांनी व्यवसायाच्या माध्यमातून आपला आर्थिक स्तर कशाप्रकारे उंच व्हावा याकरिता प्रयत्न करावे असे सांगितले. एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक पाईकराव सर यांनी बचत गटातील महिलांनी मायक्रो फायनान्स च्या विळख्यात न अडकता बँकेकडून कर्ज घ्यावे व व्यवसाय सुरू करावा असे याप्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब झिंजाडे जिल्हा समन्वय अधिकारी हिंगोली यांनी सदर संस्थेने जास्तीत जास्त म्हणजे 500 पेक्षा जास्त बचत गटांची स्थापना करावी असे सांगितले त्याचबरोबर माविम मार्फत विविध योजनांची माहिती दिली त्यामध्ये स्मार्ट प्रकल्प, नव तेजस्विनी प्रकल्प, तेजश्री प्रकल्प, व्ही. एस.पी प्रकल्प यासारख्या विविध जाणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली तसेच या संस्थेने अधिक प्रगती करून कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांच्या उपजीविकेवर अधिक कार्य करावे असे सांगितले
सामाजिक कार्यकर्ते आदित्य भैया आहेर यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या व कुठल्याही प्रकारची संस्थेची अडचण सोडविण्याकरिता सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
माहीम जिल्हा कार्यालयाचे उपजीविका सल्लागार गजानन खीरोडकर सर यांनी सब प्रोजेक्ट बाबत महिलांना माहिती दिली आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांनी जास्तीत जास्त उपप्रकल्प राबवावे व शाश्वत उपजीविका करिता प्रयत्न करावे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगलताई नरवाडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी तेच करिता संस्थेचे उपजीविका सल्लागार विष्णू वैद्य लेखापाल शेख तोफिक तसेच मंगल नरवाडे, मीरा वेडे, प्रभावती कुलकर्णी , कांचन थोरात या सर्व सीएमआरसीच्या स्टाफ ने अथक परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न त्याचबरोबर सर्व सीएमआरसीचे व्यवस्थापक, सल्लागार, लेखापाल व सर्व सहयोगी यांनी या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले.

