Thursday, February 26, 2026
Homeदौंडसुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळ गतिमान केली ...

सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळ गतिमान केली – बी. वाय. जगताप

दौंड मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणा नंतर शोकाकुल जनतेला धीर देणारे,निर्वाण समयी लाखो भीमअनुया यांना धम्म दीक्षा देणारे,भारत बौद्ध मय करणे कामी भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष म्हणून भारतभर बौद्ध धम्मा ची दीक्षा कार्यक्रम राबवणे नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बौद्ध चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले ,भूमिहीनांना जमीन मिळवून देणारे,विद्यार्थी ,कामगारांचे प्रश्न विधिमंडळात मांडणारे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचारसरणीला धरून लोकांमध्ये समानता, बंधुता, आणि न्याय या मूल्यांचा प्रसार केला भैयासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार होते आणि समाजातील वंचित शोषित वर्गासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी समाजहितासाठी आपले आयुष्य वाहिले व सर्व नेत्यांना बरोबर घेऊन आंबेडकरी चळवळ वाढविणारे नेते होते.असे विचार बी.वा य.जगताप सचिव बुद्धिस्त नालंदा बहुद्देशीय प्रतिष्ठान दौंड यांनी भवानीनगर येथे व्यक्त केले.

भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर शाखा यांचे वतीने ६ वां वर्षा वास कार्यक्रम भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दीन कार्यक्रम आयु.गोरख घोडके यांचे अध्यक्ष ते खाली संप्पन झाला ,आयु.श्रीधर बाळेकुंद्री,श्रीकांत शिंदे,विजयकुमार गायकवाड, अरुण ओहळ,गोरख घोडके यांनी आपले विचार मांडले,सूत्र संचालन सैद प्पा गायकवाड यांनी केले.धम्म वंदना श्रीधर बकेकुंद्री यांनी केली.कार्यक्रमास आयु.के.के.खंडीझोड, सूर्यकांत जानराव,जयराम सोनवणे,निलेश कदम,दिलीप आढाव,भगवान शिंदे,सिंधू जगताप रजनंदिनी जगताप स्वप्नील चीतारे इत्यादी उपासक उपा सीका उपस्थित होत्या.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments