Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूर"राजगृहाच्या आदेशाने बौद्ध विरासतींसाठी कोल्हापूरसह भारतभर जनआक्रोश!"

“राजगृहाच्या आदेशाने बौद्ध विरासतींसाठी कोल्हापूरसह भारतभर जनआक्रोश!”

मूकनायक रिपोर्टर : तानाजी राजवर्धन.जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर,दि.१७:दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया – समता सैनिक दल जिल्हा कोल्हापूरआयोजित बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती महाआंदोलन बुधवारी दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी संपुर्ण भारतातील, महाराष्ट्रातील सर्व मंत्रालयावर व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘एकाच दिवशी एकाच वेळी’ महामोर्चाचे आयोजनास हजारोचा शिस्तबद्ध मोर्चा कोल्हापूर येथेहीं पाहावयास मिळाला.बोधगया मुक्ती आंदोलनाचे जनक अनागरिक धम्मपाल आणि दक्षिण भारतातील सामाजिक चळवळीचे अग्रणी पेरियार जीं यांची जयंती तसेंच चैत्यभुमीचे निर्माते, बौद्धाचार्यांचे जनक, बाबासाहेबांचे सुपुत्र सुर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत भिमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन या दिवसाचे औचित्य साधुन “बौद्ध विरासत आपली वाट पाहत आहें..!”असे ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा कोल्हापूर’ दक्षिण-उत्तर चे जिल्हाध्यक्ष आयु.एस.व्ही.ऐनिकर आणि आयु.राजेंद्र भोसले, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, बहुजन समाजवादी, बामसेफ, लाल बावटा यांनी संयुक्तिकपणे केलेल्या आवाहनाला समस्त कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम बुद्ध, सम्राट अशोक, शिव शाहू फुले आंबेडकरवादी समविचारी सन्माननीय राजकीय, सामाजिक संघटनांनी जन आक्रोश आंदोलनासाठी जास्तीतजास्त जमावाने समता सैनिक दलाच्या शिस्तबद्ध संचालनात सकाळी ठीक ११ वाजता मोठी उपस्थिती दर्शविली होती.

ऐतिहासिक बिंदू चौक येथील महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना समस्त बौद्धांच्या मातृसंस्थेच्या हस्ते समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना – पुष्पहार अर्पण करुन दसरा चौक येथे पंचांग प्रणाम, त्रिसरण पंचशील ग्रहण करुन जवळच राजाराम महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उषा टॉकी- बसंतबहार टॉकीज पासुन डावीकडे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर कडे बौद्धांचा जन आक्रोश आगेकूच करत असतानाचे बुद्धगया रथ त्यापुढे शिस्तबद्ध बौद्धांच्या उपासक उपासिकांच्या पांढरे शुभ्र वस्त्र पोशाख निळ्या टोप्या- सर्वात तीन किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा, हाती मोठमोठे लक्षवेधी बुद्धगयामुक्ती, विहारे,लेणी बौद्ध विरासत मुक्तीचे विविध रिक्षातून सुमधुर आवाजात सुरु असलेली विरासत मुक्तीगीते – फलक – धम्मध्वज, तसेंच या आंदोलनात संरक्षण देणारे ड्रेसकोडमधील समता सैनिक दलाचे स्त्री-पुरुष जवान, ड्रेस कोड मधील जिल्हा, तालुका,शहर, ग्राम पदाधिकारी सर्वच कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध पायी चालत चालत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच करत आहेंत आणि सर्वात पुढे जन आक्रोश मोर्चाचा सुरवातीचा धम्मरथ, धम्मरथाबरोबर मधोमध असणारे भिक्खु संघातील भंतेजी, भंतेजीबरोबर प्रमुख जिल्हा पदाधिकारी, समता फोर्स असे जनआक्रोश आंदोलनाचे विलोभनीय विराट दृश्य दिसत होते…या जन आक्रोश आंदोलनावेळी मा.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात धम्म मार्गदर्शकांनी उपस्थित जनसमुदायांना संबोधित करुन यापुढेही वेळोवेळी कायमच सम वैचारिक आंदोलनात सहभागी होणेसंदर्भात आपण समविचारी बौद्धांनी आगामी काळात ‘जन आक्रोश’ सह विविध आंदोलनात सहभागी होणेसाठी कटिबद्ध राहून बाबासाहेबांनी इथपर्यंत आमच्यापर्यंत आणलेल्या धम्मरथाची आगेकूच शैक्षणिक सामाजिक राजकीय समविचारी बहुजन अनुयायी समर्थपणे सांभाळतील अशी ग्वाही, मनोकामना व्यक्त करुन केली.

मा.जिल्हाधिकारी यांना समता फ़ोर्ससमवेत प्रमुख पदाधिकारी यांनी मा.जिल्हाधिकारी यांचे दालनात जाऊन बौद्ध विरासत मागणीचे निवेदन सादर केले.

शेवटी धम्म गाथेतील “सरणतय” धम्म गाथा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील या विलोभनीय विराट शिस्तबद्ध ‘जन आक्रोश आंदोलन’ चा समारोप करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments