मुकनायक दौंड प्रतिनिधी विजय बगाडे
भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मा. बी. जी. घाटे भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका सरचिटणीसमा. दत्तात्रय कोकाटे भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व संघटक मा. पिंटू डाळिंबे यांच्या उपस्थितीत श्रीकांत साळवे यांची भारतीय बौद्ध महासभेचे दौंड तालुका संघटक संघटक पदी निवड करण्यात आली
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका शाखेच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने 11 वे पुष्प खडकी येथे अविनाश रामचंद्र उबाळे दौंड तालुका प्रचार उपाध्यक्ष यांच्या राहत्या घरी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी कलाम सूत्त अर्थात मानव मुक्तीचा जाहीरनामा या विषयावर आयु. दादा बाळू मोरे यांनी प्रवचन दिले प्रास्ताविक आयू. कैलास डाळिंबे पुणे जिल्हा पूर्व चे संघटक यांनी केले सूत्रसंचालन डी एल कोकाटे सरचिटणीस यांनी केले शुभेच्छा श्रीधर बालकुंद्री पुणे जिल्हा पूर्व चे संघटक यांनी दिल्या हा कार्यक्रम आयु.दादा बाळू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आयु. अविनाश रामचंद्र उबाळे यांनी आभार व्यक्त केले या प्रसंगी आयु. श्रीकांत साळवे दौंड यांनी भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका शाखेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि त्यांना तालुका संघटक पद देण्यात आले साळवे यांचा सत्कार तालुका अध्यक्ष आणि संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला, या कार्यक्रमासाठी अविनाश शिंदे, मोझेस राठोड, गणेश शिंदे, संतोष उबाळे, विकास साळवे, मयुर कांबळे, जयदीप बगाडे, विलास कांबळे पत्रकार उपस्थित होते तसेच खडकी येथील उपासक, उपासिका उपस्थित होते.

