मूकनायक प्रतिनिधी राजरत्न जाधव
बदलापूर :- देशातील सर्व स्त्रियांना आरोग्य सेवा पुरविण्याकरिता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. जिल्हा शल्यचिकित्सक, यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ सप्टेंबर २०२५ या दिवशी ठिकाण बदलापूर ठाणे जिल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात,स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान”अंतर्गत विशेष तज्ज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. नगरसेवक श्री अनिलजी भगत यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.नीता खोटरे, अतिरिक्त गटविकास अधिकारी, उपस्थित होत्या.
शिबिरासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टर व संस्थांनी मोलाची सेवा बजावली. त्यामध्ये :दंत शल्यविशारद : डॉ. अर्चना पवारस्त्रीरोगतज्ज्ञ : डॉ. अरुणा बेल्लुरेबालरोगतज्ज्ञ : डॉ. हेमंत काटकरमानसोपचारतज्ज्ञ : डॉ. रविंद्र चव्हाणशमन कॅन्सर टीम : डॉ.शीतल मॅडम व सहकारीमोबाईल मेडिकल युनिट – डॉ सदावर्ते मॅडम आणि टीमआयसीएमआर, मुंबई : डॉ. प्रेरणा पाटील मॅडम व सहकारीईशा नेत्रालय अंबरनाथ शाखा व त्यांची संपूर्ण टीमया शिबिरातील तपासण्या व या उपक्रमाचा लाभ एकूण १६८ रुग्णांनी घेतला असून त्यापैकी महिलांची संख्या लक्षणीय (१३४ महिला रुग्ण) होती. महिलांच्या आरोग्य तपासण्या, कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी, बालरोग तपासणी आदींमुळे स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा मिळाली.
या शिबिराबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत त्यांची संपूर्ण टीम संशयित रुग्णांचे Xray, तपासणी, Cy TB तपासणी, थुंकी तपासणी तसेच pychososcial support म्हणून निक्षय मित्र नोंदणी करण्यात आली. उपस्थित मान्यवर व सर्व आरोग्य कर्मचारी व रुग्ण या सर्वांच्या उपस्थितीत टी बी मुक्त भारत करण्यासाठी शपथ घेण्यात आली. उपस्थित रुग्ण यांचे गरजू लाभार्थी यांचे आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड काढण्यात आले.
प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथील वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत कनोजा, डॉ.अश्विनी वाणे, तालुकास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक श्री संतोष शिरोशे, औषध निर्माण अधिकारी आर वाय पाटील ,श्री जितेंद्र बोरकर आरोग्य सहाय्यक व इतर सर्व आरोग्य कर्मचारी, गतप्रवर्तक व सर्व आशा कार्यकर्ती यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली .
आशा कार्यकर्ती संजीवनी पाटील यांनी काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.टिपणी संजीवनी पाटील (आशा सेविका ).

