Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड -सेंटसेबेस्टिन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व नवीन प्रशासकीय इमारती मधील रस्त्याची...

दौंड -सेंटसेबेस्टिन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व नवीन प्रशासकीय इमारती मधील रस्त्याची दुरवस्था

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) रस्ता दुरुस्तीची मागणी

मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड : सेंटसेबेस्टिन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व प्रशासकीय इमारती मधील रस्त्याची सध्या दौंड मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे व दौंड मध्ये वाहतूक कोंडी सातत्याने होत असते सदर रस्त्याच्या जागेत एकीकडे मोठे गटार वाहत असून त्यावरील झाकणे अनेक ठिकाणी उघडी आहेत तर काही ठिकाणी ती तुटलेले अवस्थेत आहेत वाहतुकीच्या गर्दीने विद्यार्थी व पालक तसेच वयोवृद्ध व्यक्तींना नागरिकांच्या जीवितास या ठिकाणी धोका होऊ शकतो तसेच सेंटसेबेस्टिन हायस्कूल भिंती जवळील रिकाम्या जागेत ब्लॉक बसवावेत जेणेकरून विद्यार्थी व नागरिकास वावरणे सोपे जाईल तसेच सेंटसेबेस्टिन हायस्कूलच्या पश्चिमेस रस्ता खूपच खराब आहे त्या ठिकाणी विद्यार्थी पालक व महिला घसरून पडल्याने जखमी होत आहे तरी सदरील रस्ता सिमेंट काँक्रीट नव्याने तयार करावे सदरच्या भागाची समक्ष पाहणी काम मार्गी लावावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) दौंड तालुका अध्यक्ष बी. वाय. जगताप व अनेक कार्यकर्त्यांनी दौंड नगरपरिषद दौंड मुख्याधिकारी सो. यांच्याकडे निवेदन मार्फत केली आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments