मूकनायक दौंड प्रतिनिधी:विजय बगाडे
मौजे जवळगांव येथील गट नं. ७४० धात्रे स्मशानभूमीची जागा कागदपत्री नसताना बांधकाम केले आहे त्याची चौकशी करावी
मौजे जवळगांव येथील गट नं ७४० मध्ये गायरान मध्ये ग्रामपंचायतचा ठराव १० गुंठे दिलेला आहे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर दिलेला असून अ ,ब, क, ड, तहसीलदाराकडे न देता व मुख्याधिकारी साहेबांच्या शिफारस पत्र नसताना बांधकाम केले आहे व कुणी बांधकाम केले आहे ज्यांनी बोगस बांधकाम केले आहे जो कोणी गुत्तेदार असेल त्याच्यावर कारवाई आठ दिवसाने न केल्यास स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालय आंबेजोगाई समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा उपोषण करते स्वराज्य शक्ती सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नवनाथ तुळशीराम हरे यांनी दिला जवळगांव ता. अंबेजोगाई जिल्हा, बीड रहिवाशी असून शासकीय पडीक गट नं.४६६ व नं. ७४० मध्ये गेली ३०ते ४० वर्षांपासून राहत आहोत आम्ही स्वतःला इतरत्र कोठेही जागा नसून बेघर कुटुंब घरकुलापासून वंचित आहोत या अगोदरही आपल्या कार्यालयस वेळोवेळी अर्ज देऊन १) दिनांक ०३/०२/२०२०, दि.०३/०९/२०२२, दि.२५/०८/२०२३, दि.१०/०१/२०२४ व दि.२३/०१/२०२४ या तारखेला दिलेल्या कार्यालयाला निवेदनाच्या दिलेल्या प्रति व तसेच तोंडी विचारणा केली असताना तरी देखील आपल्या कार्यालयाने कसलीही दखल घेतली नाही त्या गट नंबर ४६६ व गट नं. ७४० मध्ये या अगोदर ग्रामपंचायत जवळगांव यांनी रमाई आवास योजना झोपडपट्टी, पाण्याची टाकी, संस्कृतिक सभागृह, नळ कनेक्शन, सिमेंट रस्ते, पशुवैद्यकीय दवाखाना, तलाठी ऑफिस डाक घर, खंडोबा मंदिर सभागृह, व आर. ओ.प्लांट इ. सर्व काही मोयी देऊन त्या जागेत काही जणांना पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना लाभ देण्यात आलेला आहे असे असताना काही बेघरांना जागा नसल्याने पंतप्रधान व रमाई आवास योजनेपासून वंचित राहावे लागत आहे तरी आमच्या अर्जाची सहानभूतीपूर्वक विचार करून आम्हाला १४/०८/२०२५ पर्यंत काही तोडगा नाही काढल्यास दिनांक १५/ ८/२०२५ रोजी पासून आम्ही सर्व बेघर कुटुंब लोकशाही मार्गाने पंचायत समिती आंबेजोगाई कार्यालय समोर उपोषण करणार आहोत असे स्वराज्य शक्ती सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नवनाथ तुळशीराम हरे निवेदनाच्या माध्यमातून दिले आहे,महाराष्ट्र शासनाने आमच्या मागण्याची दखल न घेतल्यास स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ करुणाजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अनखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा प्रशांत विष्णू सोनवणे यांनी मूकनायक चे प्रतिनिधींशी विजय बगाडे यांच्याशी बोलताना माहिती दिली,

