Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रबौद्ध विद्यार्थी वसतीग्रहात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

बौद्ध विद्यार्थी वसतीग्रहात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

मूकनायक वसमत प्रतिनिधी मिलिंद आळणे

वसमत: जवळा बाजार येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत चालत असलेले इंदिरा गांधी शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली द्वारा संचलित बौद्ध विद्यार्थी वस्तीग्रह, जवळा बाजार येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास बार्टी, पुणेचे समतादूत ऍड. रहीम कुरेशी, जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती पाटील मॅडम, डॉ. प्रवीण पंडित, एकनाथ कऱ्हाळे, राहुल थोरात महादेव बुलाखे, अनिल भालेराव तसेच वस्तीग्रहाचे अधीक्षक किरण मोरे व वसतिगृहातील कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. यावेळी समतादूत ऍड. रहीम कुरेशी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला त्यांच्याविषयी माहिती सांगून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढविला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किरण मोरे यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments