मूकनायक सांगली वृत्तसेवा
सांगली दि २३: येथील शिवाजी विद्यापीठ सलग्न एन. एस सोटी विधी महाविद्यालयात एलएलएम अंतिम वर्षात शिकत असणारे व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ॲड. अमोल बबन वेटम यांनी देश पातळीवर घेण्यात येणाऱ्या नेट (लॉ) परीक्षा उत्तीर्ण केली असून सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडी प्रवेशाकरीता पात्र झाले आहेत. त्यांनी आपले या यशाचे श्रेय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच आई- वडील, दोन बहिणींना दिले. या कॉलेजचे सहायक प्राध्यापक मेघना लिमये यांनी नेट परीक्षाकरिता ‘ विशेष मार्गदर्शन ‘ करून प्रोत्साहित केले.
तसेच या कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमित सवदी, डॉ. अतुल कुरणे, डॉ. अश्विनी कुलकर्णी, मनीष देशपांडे, डॉ. एम. एस. कुंभोजकर, स्वरूपा खाडे यांच्यासह माजी प्राचार्य प्रसाद जोशी, माजी सहा. प्राध्यापक निर्मला पाटील, प्रसाद कांबळे आदींनी त्यांनी केलेल्या अध्यापनातून या नेट (लॉ) अभ्यासक्रमाचा पाया अधिक भक्कम करून घेतला. ग्रंथपाल अविनाश साळुंखे यांनी वेळोवेळी पुस्तके आणि इतर वाचन साहित्य उपलब्ध करून दिले.

