Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरखानापूर येथे युवकाची आत्महत्या की हत्या.. ?

खानापूर येथे युवकाची आत्महत्या की हत्या.. ?

मूकनायक रिपोर्टर तानाजी राजवर्धन.

गारगोटी : भुदरगड दि.१७/०७/२०२५.गांव खेड्यातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मौजे पिंपळगाव बुद्रुक, तालुका कागल येथील श्री. दत्तात्रय तुकाराम कांबळे वय ४७ यांचा मुलगा हर्षद संगीता दत्तात्रय कांबळे वय १९ हा गारगोटीपासुन पूर्वेला ४ किमी अंतरावर डोंगरराईत असणाऱ्या ‘विद्या वर्धिनी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि VVIT पाल, तालुका भुदरगड’ या संस्थेत डिप्लोमा इंजिनिअरींग 2025/26 साठी प्रवेश घेणेकरता मंगळवारी दि. १५/०७/२०२५ रोजी सकाळी १० ते १०:१५ या दरम्यान आपल्या आई वडिलांबरोबर सुसंवाद करुन आपले दुचाकी वाहन घेऊन गारगोटी येथून चार किमी अंतरावर पाल येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचे आणि आत्ता महाविद्यालयातून माघारी घरी जाणेकरता आंबवणे जवळील ‘तळे माऊली’ ह्या जवळच्या रस्तामार्गाने गावाकडे येणार असल्याचे फोनवरून आपल्या वडिलांना कळवितो… दिवसभर आईवडील शेतकामात व्यस्त असतात दुपारी १२ नंतर मुलग्याचा फोन स्विच ऑफ समजलेनंतर कांही प्रमाणात मोबाईल नेटवर्किंग रेंजचीं समस्या असेल असे गृहीत धरून दुपारनंतर ३ वाजेपर्यंत फोन स्विच ऑफच दाखवत असलेने वडील दत्तात्रय तुकाराम कांबळे यांनी गावातील हर्षदच्या मित्रांकडे विचारपुस करुन त्यांना आणि कांही जवळचे नातेवाईक यांना सोबत घेऊन गारगोटी भुदरगड पोलीस चौकी येथून तक्रार दाखल करुन पोलीस सहकारी, आंबवणे गावचे पोलीस पाटील यांनी कॉलेजरोड पासुन तळे माऊली- आंबवणे – खानापूर च्या रस्त्याजवळ आसपास चौकशी केली असता एका म्हैशी चारणाऱ्या वयस्कर व्यक्तीने काळे जॅकेटधारी, काळी पॅन्ट असलेला दुचाकीवरून एक मुलगा आंबवणे- तळे माऊली दिशेने गेल्याचे सांगितले. त्याप्रमाणे शोध घेतल्यानंतर तळे माऊली पासुन पश्चिमेला २ किमी अंतरावर जंगलाकडेला दुचाकी निदर्शनास आली… आंबवणेजवळील तळे माऊली पासुन आत घनदाट जंगलात शोधाशोध मोहीम रात्रीं 12 वाजेनंतर थांबविण्यात आली… मंगळवारी दुपारनंतर ०४ वाजलेपासून शोध मोहीम सुरु होती दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे दिनांक १६/०७/२०२५ रोजी जास्त प्रमाणात पिंपळगाव बुद्रुक गावातील तरुण युवक, नातेवाईक, गारगोटी भुदरगड पोलीस सहकारी, आंबवणे गावचे पोलीस पाटील या सर्वांनी शोध घेण्यासाठी अपार मेहनत, सहकार्य सुरु केले होते… सकाळी दहा वाजेच्या दरम्यान अचानक झाडीत एका झाडावर चकचकीत दोरीसह गळफास अवस्थेत लटकलेला मृतदेह निदर्शनास आल्याने वडील दत्तात्रय तुकाराम कांबळे यांनी जंगलातील सकाळच्या शांततेत काळजाला पिळवटून टाकणारा आर्त टाहो फोडला… झाडावर दोन ठिकाणी आवळलेल्या, हणवटीच्याच बाजूला आलेला दोरीचा एक शेंव, चकचकीत पिवळ्या नॉयलॉन मजबुत दोरीने गळफासीत मृतदेहाच्या डोक्यावर वरच्यावरच असलेली पोपटी रंगाची कॅप, बंद डोळे, साधारण ओठांच्या जवळ आलेली जीभ, किंचितच दुमडलेले हात, जमिनीपासुन हाताच्याच उंचीवर दिसणारे हिरवट पांढरे – काळे सॅंडल घातलेले लटकणारे पाय, एका पायाच्या बोटातून सॅंडलवर ओरंघळणारे लालभडक रक्त, जवळच जमिनीवर असणारी काळी बॅग असे हृदयद्रावक दृश्य पाहून सर्वांनाच अश्रू अनावर झाले…एकमेकांच्या सहकार्याने मृतदेह खाली उतरवून बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शव विच्छेदनासाठी गारगोटी येथील सरकारी हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर आईवडील, नातेवाईकांच्या काळजाला पिळवटणाऱ्या आक्रोश, आर्त टाहोसह, हृदयद्रावक अश्रूपुर्ण नयनांनी गांव जमावासह अत्यंत शोकाकुल वातावरणात युवावस्थेतील मृत तरुण हर्षद संगीता दत्तात्रय कांबळे याचे सायंकाळी पाच वाजता पिंपळगाव बुद्रुक गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले…पुढील तपास गारगोटी भुदरगड पोलीस करत आहेंत… मूकनायक रिपोर्टर: तानाजी राजवर्धन.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments