{ आषाढी गुरुपौर्णिमा गीत }
➖➖➖➖➖➖➖
काळोख,मनातला कसा मी सारु..
गुरु,गौतमा तुच विश्वाचा गुरु..
तुच जागवे मनुष्यत्व मनात..
पंचशील अष्टांग उजेडाची ज्योत..
नीतीच्या वर्तनाला करु या सुरु…
गुरु गौतमा तुच विश्वाचा गुरु..
स्वातंत्र्य समता निसर्गाची देणं..
नाही कुणाचं असे कुणाला दानं..
बंधुभावाला सारे आपण स्मरु..
गुरु गौतमा तुच विश्वाचा गुरु..
माया मत्सर हे शञुचे आगार..
करुणा मैत्रीला तू केले जागर..
प्रज्ञेचं बियाणं या मातीत पेरु..
गुरु गौतमा तुच विश्वाचा गुरु..
जगी दुःख आहे तुच साक्ष केले..
त्याशी निराकरण तुच शोधले..
बुध्दं धम्मं संघं ञिसरणं जाऊ..
गुरु गौतमा तुच विश्वाचा गुरु..
काळोख मनातला कसा मी सारु.?
दिनकर रा मडकवाडे ✍️
१० जुलै २०२५
९४२३४१८१६०
चित्रकार मनिष रामटेके
➖➖➖➖➖➖➖➖

