Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूर"श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था"तर्फे 'राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार' वितरण.

“श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था”तर्फे ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार’ वितरण.

मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे

कोल्हापूर : श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था आयोजित स्नेह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्य स्थानी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार तर स्वागत अध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी मदन पवार हे होते सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

समाज कार्यात मोलाचे योगदानाबद्दल मदन पवार यांना ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने’ गौरविण्यात आले आहे.

यावेळी बोलताना स्वागत अध्यक्ष मदन पवार म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना एकल महिला या अनेक सामाजिक मानसिक समस्येने ग्रासलेल्या आहेत. असे संस्थेच्या लक्षात आले. त्यामुळे संस्थेने त्यामध्ये विधवा, परितक्ता, घटस्फोटित, अविवाहित व आधारविहीन महिलांना न्याय, सुरक्षा, स्वावलंबन, मिळवून देण्यासाठी गेली अनेक वर्षे कार्य सुरु केले.या कार्यामुळे श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था’ ही सामाजिक क्षेत्रातील एक प्रेरणादायी संस्था ठरली आहे.

विशेषतः कोविड महामारीच्या काळात या संस्थेने केलेले अतुलनीय कार्य म्हणजेच गरजू महिलांसाठी अन्न, औषधे, वैद्यकीय मदत, मानसिक समुपदेशन यांसारख्या विविध पातळ्यांवर केलेले योगदान, हे समाजासाठी आदर्श ठरले आहे. एकल महिलांच्या हक्कांसाठी लढणारी, त्यांना आत्मभान व आत्मविश्वास देणारी ‘श्रावस्ती’ संस्था आज ‘आशेचा एक उजळता किरण’ बनली आहे.

अशा सेवाभावी संस्थेकडून मिळालेला राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे आणि नवीन ऊर्जा मिळाली आहे असे मदन पवार म्हणाले.

या कार्यक्रमास सेवानिवृत्त तहसीलदार अशोक नाईक, कबनूर गावच्या सरपंच सुलोचना कट्टी, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे प्रमोद पाटील, संस्थेचे अध्यक्ष भक्ती शिंदे, सचिव राहुल वराळे व मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments