छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर :एसटी महामंडळाच्या शिवाई या इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांना ‘नो एन्ट्री’ असल्याचे पाहायला मिळत आहे. या बसमध्ये दिव्यांगांसाठी राखीव सीट आहे. मात्र तरीदेखील त्यांना प्रवेश देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. त्याचे कारण म्हणजे एसटी शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये तिकीट मशीनमध्ये इन्स्टॉलेशन नसल्यामुळे दिव्यांगांना डावलण्यात येत आहे. तिकीट मशीनमध्ये इन्स्टॉलेशन नसल्याने दिव्यांगांना राखीव जागा उपलब्ध होत नाहीत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये ५ हजार इलेक्ट्रिक गाड्या दाखल होणार आहेत. त्यामध्ये तरी दिव्यांगांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दिव्यांग प्रवाशांकडून केली जात आहे.

