मुकनायक ठाणे वृत्तसेवा
ठाणे : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष ठाणे शहर युवा आघाडी, पँथर साईनाथ खरात व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी सुनीता शेट्टी ह्या दिनांक 12 जून 2025 रोजी लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसण्याबाबत निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे थांबवण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ त्यांनी हे संविधानिक आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सुनील पांडे नामक व्यक्तीने सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरात अनधिकृतपणे सीडी उभारलेली असून, याविरोधात सुनिता शेट्टी आणि पँथर साईनाथ खरात यांनी वेळोवेळी लेखी तक्रारी दिल्या. परंतु माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि राजकुमार यादव यांच्या राजकीय दबाव व हस्तक्षेपामुळे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्या कार्यकाळामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप पॅंथर साईनाथ खरात यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, दिनांक: ०२ डिसेंबर २०२४ रोजी अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुनील पांडे यांनी आपल्या पत्नी आणि नात्यातील महिलांमार्फत कारवाई रोखण्यासाठी पेट्रोलसहित आत्मदहनाचा कट रचल्याचे आरोप आहेत, तरीदेखील संबंधितांवर अजून कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही.
याप्रकरणी न्यायालयाने सुद्धा महापालिका विधी विभागामार्फत D.P.L. ची प्रतिक्रिया करून कारवाई करण्याचे आदेश दिले असूनदेखील प्रभाग समिती अजूनही निष्क्रियच आहे. म्हणूनच निष्क्रीय प्रशासन आणि दबावाच्या व पद्मश्री पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या शब्दात सांगायचे म्हटले तर प्रस्थापित राजकीय लोकांची र**ड म्हणून वावरणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात पँथर साईनाथ खरात सुनिता शेट्टी व स्थानिक रहिवासी यांनी संविधानिक मार्गाने अन्नत्याग उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मी फुले, शाहू आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचा, एक छोटासा कार्यकर्ता व छोटासा पत्रकार असल्यामुळे आजवर मला योग्यरिते न्याय मिळाला नसल्याचा आरोप खरात यांनी निवेदनात केला.
परंतु एमपीएससी दर्जाचे नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त श्री सोमनाथ बनसोडे योग्यरीत्या कारवाई करतील अशी आशा देखील खरात यांनी व्यक्त केली आहे.

