Thursday, February 26, 2026
Homeनागपूर"२६ नोव्हेंबर" हा चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे - प्रशीका गायकवाड

“२६ नोव्हेंबर” हा चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे – प्रशीका गायकवाड

#बुटीबोरीची प्रशीका गायकवाड हिने साकारली ‘२६ नोव्हेंबर’ मध्ये भूमिका

तालुका प्रतिनिधी

नागपूर/०५ मे :-२६ नोव्हेंबर हा चित्रपट मानवी समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची ताकद देणारा असून, घटनात्मक हक्काची जाणीव करणारा सुद्धा आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला सन्माणाने जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाला जीवनाचा आनंद घेण्याचा सामान अधिकार आहे. हा चित्रपट संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी असून जे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना सामान अधिकार देते. म्हणूनच २६ नोव्हेंबर हा केवळ चित्रपट नसून,ही एक चळवळ असल्याचे मत या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या प्रशीका गायकवाड हिने बालाजी कॉन्व्हेंट येथे आयोजित कौतुक सोहळ्यात बोलतांना आपले मत व्यक्त केले. येत्या ९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘२६नोव्हेंबर ‘या मराठी चित्रपटात बुटीबोरी नगरितील, बालाजी कॉन्व्हेंट मध्ये इय्यता १०त शिकणारी युवा कलाकार प्रशिका मनोज गायकवाड ही भूमिका साकारत आहे.तिच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी बालाजी कॉन्व्हेंट चे संस्थापक डॉ प्रकाश नेऊलकर यांनी आज दि ०५ मे ला प्रशीकाचा कौतुक सोहळा शाळेच्या प्रांगणात आयोजित केला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, डॉ. जुई जवाडे, विजय पाटकर, भारत गणेशपुरे, मुस्ताक खान, गणेश यादव, डॉ. विलास उजवणे, किशोर चौगुले, यांसारखे दिग्गज अभिनेते विविध भूमिका साकारत आहे. बुटीबोरी येथील अतिशय सामान्य कुटुंबातील प्रशिका गायकवाड ला मुंबई सारख्या कला नगरीत मोठया पडदयावर कामं करण्याची संधी मिळाली याबद्दल बुटीबोरी वासियांनी तसेच बुटीबोरी मराठी पत्रकार संघ,बालाजी कॉन्व्हेंट चे संस्थापक डॉ प्रकाश नेऊलकर, मुख्याध्यापक भोयर सर, निखिल साबळे, शिक्षक नितीन कुरई सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन अवश्य पहावा, असे आवाहन अभिनेत्री प्रशिका गायकवाड, निर्माता निलेश ओंकार यांनी केले. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन शोभा उरडे यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार हे आहेत. या चित्रपटातील गाणी जावेद अली, आर्या आंबेकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे या नामवंत गायकांनी गायली आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments