Thursday, February 26, 2026
Homeनवी मुंबईसंतोष सुतार यांच्याकडून पालिका आयुक्तांना निवेदन...सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल च्या प्लॉट साठी १०९...

संतोष सुतार यांच्याकडून पालिका आयुक्तांना निवेदन…सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल च्या प्लॉट साठी १०९ कोटींचा खर्च – परंतु हॉस्पिटल निर्मितीसाठी अर्थसंकल्पात नाही उल्लेख;

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेने बेलापूर येथे प्रस्तावित सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी सिडकोला १०९ कोटी रुपये दिले असले तरी, सदर प्रकल्पाचा उल्लेख चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.सदर हॉस्पिटलसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी “लाडक्या बहिणीसाठी” ही संकल्पना पुढे रेटत बेलापूर येथे हॉस्पिटल बांधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सिडकोकडून जागा घेण्यासाठी १०९ कोटी रुपयांचा निधी पालिकेने खर्च केला. मात्र, प्रत्यक्ष हॉस्पिटल उभारणीसाठी ना कुठले टेंडर जाहीर करण्यात आले, ना अर्थसंकल्पात कुठलाही निधी मंजूर करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर, जर निश्चित वेळेत बेलापूर परिसरात सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल याची निर्मिती झाली तर नवी मुंबई पालिका क्षेत्रातील अनेक तरुण-तरुणी यांना रोजगार मिळेल असे काँग्रेस नवी मुंबई जिल्हा ओबीसी विभागाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष सुतार यांनी सांगितले तसेच नागरिकांच्या टॅक्स रुपी पैशाचा गैरवापर होऊ नये, यासाठी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.यावेळी आयुक्तांनी सुतार यांना सांगितले की, या संदर्भातील सविस्तर माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (RTI) घेता येऊ शकते. त्यामुळे सुतार यांनी पुढील टप्प्यात माहिती अधिकारात अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.संतोष सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “१०९ कोटी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होऊन देखील आजवर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे काहीही ठोस पुढे आलेले नाही, ही बाब जनतेच्या विश्वासाला तडा देणारी आहे. आम्ही या विषयात सातत्याने आवाज उठवत राहू.”नवी मुंबईत दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रस्तावित हॉस्पिटल अत्यंत गरजेचे असून, प्रशासनाने या विषयात पारदर्शकता राखून पुढील पावले उचलावीत, अशी मागणी शहरवासीयांकडून जोर धरत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments