मूकनायक वसमत प्रतिनिधी आळणे मिलिंद
वसमत : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिना निमित्त दि ७ मे संबोधी बुद्ध विहार हर्षनगर वसमत येथे अभिवादनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी माता रमाई यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सामूहिक त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली . डॉ एन एन कुंटे ,आनंद वायव्हळ,मेजर भगवान सुर्यतळ , डॉ नामदेव मुळे , आर एस नंद ,आळणे मिलिंद.गुरुनाथ गाडेकर समतादूत यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यवर प्रकाश टाकला . या कार्यक्रमात सूत्रसंचालन रघुपति सरोदे यांनी केले, तर आभार साहेबराव सरोदे यांनी मानले .या कार्यक्रमाला खंडोजी पंडित,भारशंकर, शिवभगत सर आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते

