Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन!

मूकनायक वसमत प्रतिनिधी आळणे मिलिंद

रुंज: येथे अहिल्या राणी होळकर यांची 300 वी जयंती खूप मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व जय मल्हार झेंड्याची स्थापना करण्यात आली . जयंतीस प्रमुख उपस्थिती म्हणून अडे साहेब बीड जमादार व चव्हाण साहेब पोलिस निरीक्षक यांची प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थीती लाभली .अध्यक्ष गोविंद बिस्मिले , पदी उपस्थित होते. आणि उपाध्यक्ष श्रीराम वत्ते व . धनगर समाज ता.आधेक्षय श्रीराम वड्डे सर.आळणे मिलिंद हे होते. व सर्व जय मल्हार मित्र मंडळ महिला व पुरुष खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते …पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन! भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे!

यावेळी धनगर समाजातील .प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम फुलझळके (सरपंच), बाबाराव माखणे तंटा मुक्ती आधेक्षय,उद्धव माखणे पाटील ,सामाजिक कारेकर्ते ,विनायक माखाणे पाटील, विठ्ठलराव माखणे पाटील ज्ञानेश्वर माखणे, ता आधेक्षय .संभाजी ब्रिगेड ..तुकाराम बैकरे गुणाजी बैकरे , भिवराव वड्डे , गणेश वड्डे, श्रीराम वड्डे, माधव बहिरे कृष्णा बहिरे, साटवाजी बहिरे, श्रीराम वते, ईश्वर डोके, गोविंद बिसमिले , मारुती रोडगे, दत्ता देवदे , मारोती देवदे, पांडुरंग देवदे, व्यंकटी चोपडे, देविदास बेळगे , व्यंकटी बेळगे नामदेव बेळगे विठ्ठल बेळळगे ,शिवाजी देवदे , चांदोजी अमलगोंडे ,बिरोबा तीडमिडे, खंडोजी डोके बालाजी डोके , भगवान डोके, जनार्धन डोके , संतोष देवदे , महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

Recent Comments