Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरखोटा वारस दाखला देणाऱ्या शियेच्या पोलीस पाटीलांना पदमुक्त करण्याची मागणी

खोटा वारस दाखला देणाऱ्या शियेच्या पोलीस पाटीलांना पदमुक्त करण्याची मागणी

मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील शिये इथल्या मधुकर गणपती पाटील यांनी पोलीस पाटील मनीषा विजय सिसाळ यांना हाताशी धरून खोटा वारस दाखला तयार करून घेतलाय, अशी तक्रार त्यांचा पुतण्या अवधूत विष्णू पाटील आणि रघुनाथ गणपती पाटील यांनी करवीरचे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी केली आहे. या प्रकरणी पोलीस पाटील मनीषा सिसाळ यांना पद मुक्त करावं तसंच महसूल आणि भूमिअभिलेखकडून सातबारा नोंद रद्द करावी, अशी मागणी अवधूत पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments