मुकनायक नवी मुंबई वृत्तसेवा
बेलापूर नवी मुंबई- गेले काही दिवसापासून सोशल मीडियावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील वंशज प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांच्या बद्दल काही नकली आंबेडकर कार्यकर्ते अपशब्द बोलून त्यांची मानहानी करत होते तसेच केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी हा स्टंट केला होता. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे समस्त आंबेडकरी चळवळीचे आन बान आणि शान आहेत त्यामुळे समस्त आंबेडकरी जनतेने आंबेडकर घराणे यांचा मान सन्मान करणे आवश्यक आहे आणि जो कोणी हा मानसन्मान करणार नाही अपशब्द वक्तव्य करेल त्याला आंबेडकरी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही आंबेडकरी जनतेकडून सांगण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बेलापूर परिसरात राहणारी नकली आंबेडकरी कार्यकर्ते सीमा रणदिवे हिला वंचित बहुजन आघाडी तसेच रिपब्लिकन सेना च्या महिला कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला असून इथून पुढे जर आंबेडकर घराण्याविरुद्ध अपशब्द काढले तर याद राख असाही दम दिला. याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द काढणाऱ्या नकली आंबेडकर कार्यकर्ते जया भनसोडे आणि राजू टाते यांचा नंबर आहे असेही त्यांनी सांगितले.

