नवी मुंबई, 16 मे – नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा विभागाच्या सुमार कामगिरीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मागील गेले दोन महिन्यांपासून पाईपलाईनच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम सतत रखडत असून, यामुळे पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होत आहे.
आज सकाळी अनेक भागांमध्ये अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा झाला, ज्यामुळे अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवला. सांगितलेल्या वेळेत पाणीपुरवठा न करता दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचा संताप अधिकच उफाळून आला आहे.
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दुरुस्तीचे चे काम पूर्ण तयारीने दिलेल्या निश्चित वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे अत्यंत गरजेचे अत्यंत आवश्यक असताना देखील या गोष्टीचे कोणतेही गांभीर्य न ठेवता पाईपलाईन दुरुस्ती कामात नेहमीच विलंब केला जातो आणि दिलेल्या वेळेत पाणीपुरवठा होत नाही निश्चित केलेल्या वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने नवी मुंबई पालिका क्षेत्रातील लाखो सामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी देखील पोट आणि तिजोरी भरलेल्या नवी मुंबई पालिकेतील वरिष्ठ अधिकारी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी अभियंता यांना सामान्य नागरिकांचे काहीच पडलेले नाही असे स्पष्ट दिसून येत आहे.
सततच्या समस्यांमुळे संतप्त नागरिक
नागरिकांच्या मते, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यास अपयशी ठरत आहेत. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी वारंवार खोदकाम केले जात असल्याने रस्त्यांचीही मोठी हानी झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांच्या रोजच्या जीवनावर परिणाम होत आहे.
समाजसेवकांचा इशारा
नवी मुंबईतील संवेदनशील समाजसेवकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर पाईपलाईनची समस्या लवकरात लवकर सोडवली नाही, तर नवी मुंबईतील नागरिक मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी प्रशासनाला सुचविले आहे की, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि नागरिकांना वारंवार वेठीस धरू नये.महापालिकेची प्रतिक्रिया आवश्यकया पार्श्वभूमीवर, महापालिकेने या समस्येवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांचा संताप शांत करावा अशी नागरिकांची मागणी आहे. पाईपलाईनचे काम जलद आणि कार्यक्षमतेने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे.

