Thursday, February 26, 2026
Homeदौंडरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) यांच्या वतीने दौंड...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) यांच्या वतीने दौंड ग्रामपंचायत मधील लिंगाळी भ्रष्टाचाराच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन

मूकनायक दौंड प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड, दि 23 : दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत मध्ये लिंगाळी मसनेरवाडी/ माळेवाडी/ मेरगळवाडी या गांवामध्ये ६ कोटी रुपयांची भारत सरकार जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन गेली ४ ते ५ वर्षे झाली असून सदर योजनेचे अर्धवट काम करून ठेकेदारांना रक्कमा अदा करण्यात आलेल्या आहेत सदर योजना कार्यान्वित न झाल्याने वरील गांवामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सदर योजने मध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असल्याने सदर भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी आंदोलना कडून मागणी करण्यात आली तसेच जिल्हा परिषद च्या दलित वस्ती, अनुसूचित जाती – जमाती वस्तीच्या विकासाची कामे सदर वस्तीत न करता इतर अनेक ठिकाणी केल्याची चौकशी करण्यात यावी तसेच शाहूनगर (जगदाळे वस्ती ), पासलकर वस्ती, बालाजी नगर, वेताळ नगर, या परिसरात दलित व बुद्ध जनसंख्या जास्त असल्याने जातीय द्वेष भावनेतून लिंगाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील जगदाळे यांनी पिण्याच्या पाण्यापासून नागरिकांना वंचित ठेवले आहे त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा इत्यादी व इतर मागण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे जिल्हा आरपीआय माजी सरपंच नरेश बलभिम डाळिंबे हे बुधवार दिनांक २३ /एप्रिल रोजी पासून दौंड तहसील कार्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक धरणे आंदोलन करीत आहे आंदोलनातील मागण्या १) दलित व बुद्ध जनसंख्या जास्त असल्यामुळे शाहूनगर, जगदाळे वस्ती, पासलकर, वस्ती बालाजी नगर, सरस्वती नगर, इत्यादी परिसरात या भागाला नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करावी २)लिंगाळे माळेवाडी मसनेरवाडी मेरगळवाडी या जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झालीची चौकशी व्हावी ३) अनुसूचित जाती नवबौद्ध विकास निधी(दलित वस्ती सुधार योजना) इतर ठिकाणी वापरण्यात आलेली आहे याची चौकशी व्हावी व ग्रामपंचायत बॉडी रद्द करावी आंदोलनातील या मागण्या करण्यात आल्या

- Advertisment -

Most Popular

Recent Comments