नागपूर, दि. २६:कायदेपंडित बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३० एप्रिल १९३७ साली नागपुर जिल्हा हायकोर्टमध्ये अचानक का आले होते? त्यावेळी ब्रिटिश शासनाच्या एका कोर्टात स्वातंत्र्यसैनिक संत अंगनदास यांना मोठ्या अपराधी आरोपात फाशीचीं सजा सुनावन्यात आली होती, त्यावेळच्या मध्यप्रान्त सी. पी. एन्ड बेरार क्षेत्रात कामगार व समाज संघटक म्हणुन आपल्या कामातुन दुरवर प्रचलित असलेले “जय भीम” घोष चे जनक कामठीचे ‘बाबु हरदास एल. एन.’ यांनी हीं केस सरळ बॉम्बेला (मुंबईला) ख्यातनाम बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेपर्यंत पोहचवली.
या केसचा परिपूर्ण अभ्यास करुन बाबासाहेबानी नागपुर हायकोर्टमध्ये येवुन येथील जज पुढे तर्कशुद्ध युक्तिवाद (हेरिन्ग) केला. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचा खुप मोठा चाहता वर्ग मोठ्या संख्येने हायकोर्टमध्ये गर्दी करुन होता. लोकांचा जोश बघुन बाबासाहेब बोलले होते, “हे पहा लोकहो मी इथे कोणतेही समाजकार्य करन्यास आलो नाही, हे सरकारी काम आहे. आपण आलाच आहात तर शांत रहा व कोर्टकार्यवाही समजुन घ्या…!”
याच कोर्टात जजसाहेबांना ३० एप्रिल १९३७ ला सन्त अंगनदास यांची बॅरिस्टर डॉ. बाबासाहेबांमुळे फाशीच्या सजेतुन मुक्तता करावी लागली होती आणि याच दिवशी वेळेचे औचित्य साधुन कामठी शहरात ‘श्री टुरिन्ग टाकीज़’ मध्ये बॅरिस्टर डॉ बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या एका भव्य नागरी सत्काराचे आयोजन बाबु हरदास यांनी केले होते. असा इतिहास आहे. बरोबर ८८ वर्षानंतर या नागपुर शहर सिविल लाइन झेड. पी.ऑफिस च्या अगोदर डावीकडील सुरक्षित स्मारक हेरिटेज बिल्डिंग, हायकोर्ट पुराणी बिल्डिंगमध्ये ३० एप्रिल २०२५ ला प्रथमच दुपारी ३ वाजता इतिहासाला उजाळा देण्यासाठी एक कटआऊट ठेवुन बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्याचा ‘प्रथम वर्ष’ विशेष आयोजन सत्यशोधक समाज, मानवाधिकार टिम आणि नागपुर इतिहास संशोधक टिम यांचे वतीने आयोजन केल्या गेले आहे. तसेंच सत्यशोधक नागमित्र धर्मेश यांच्या एका पुस्तकाचे या इतिहास विषयावर पुस्तक प्रकाशन करत आहोत. याचीं सुचना भारत सरकार ऑर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया, हेड डायरेक्टर टी.वी. टॉवर हेड ऑफिस व सदर पोलिस स्टेशन सोबत शेकडो लॉयर व अनेक जजसाहेबांपर्यंत या प्रथम आयोजनाचे रितसर लेटर पोहचविले गेले आहेत. आपण सर्व महिला पुरुष अनेक कार्यकर्ता तसेंच इतरांना घेवुन यावे अशी जाहीर विनंती करण्यात येत आहें.
मुख्य आयोजक: सत्यशोधक नागमित्र धर्मेश पाटील, संपर्क क्रमांक : ९३२५१४६७३४. (१६ अवॉर्ड्स प्राप्त प्राचीन पुरातत्व इतिहास संशोधक, पालि धम्मलिपि रायटर व प्रशिक्षक कार्यकर्ता दिक्षाभुमी नागपुर) आणि विशेष सहकारी ऍड. शेंडे जी, ऍड. गौरखेडे जी, ऍड. गजभिये, ऍड. पाटील, ऍड. आटे जी, प्रकाश वानखेड़े, भीमराव रामटेके, सुभाष चहान्दे, वासुदेव वानखेड़े, पिन्टु शेवाडे, प्रकाश जिचकार, रामदास गजभिये, सुधिर पाटील, बाळू वान्द्रे, बोम्बले साहेब, रामचंद्र झोडापे, सुभाष गायकवाड़, शोभा पाटील, राणी रा. मोहोड, डॉ. घोष मॅडम जी, राहुल बोरकर, सुनिल लांजेवार, सुनिल मेश्राम व ईतर सर्व कार्यकर्ते आहेंत. अशी माहिती मुख्य आयोजक यांनी दिली आहें.

