Thursday, February 26, 2026
Homeदौंडडॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळी साठी महिलांचे समता सैनिक दल मोठ्या प्रमाणात...

डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळी साठी महिलांचे समता सैनिक दल मोठ्या प्रमाणात उभारणार . – सुजाता ओहळ

मूकनायक प्रतिनिधी दौंड- विजय बगाडे

दौंड, दि. 29: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांती लढ्यात समता सैनिक दला चे योगदान खूप मोठे होते, समता सैनिक दल देश व समाज ऐक्यासाठी झटणारे आहे भारतीय संविधान समता, स्वतंत्र,बंधुता यांच्या बाजूने आपण उभे आहेत म्हणून आज अशा समता सैनिक दलाची जादा प्रमाणात गरज आहे,त्या मध्ये महिला चा अधिक सहभाग वाढवणार समता सैनिक दलामध्ये स्त्रीप्रती सन्मानाची भावना निर्माण होईल त्यांच्या समस्येसाठी लढण्याचे काम होईल. स्त्री व स्त्री समाजात समानता निर्माण करतील असे विचार सुजाता ओहळ अध्यक्ष पुणे जिल्हा पूर्व महिला यांनी दौंड पानसरे वस्ती येथे व्यक्त केले .भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर पुरुष व महिला शाखा यांचे विद्यमाने महिला समता सैनिक दल प्रशिक्षण देण्यात आले.त्यामधे सुमारे २५ महिलांनी सहभाग नोंदवला.आयु.रोहिणी ढवळे या अध्यक्ष स्थानी होत्या . धम्मवंदना श्रीधर बाळेकुंद्री यांनी घेतली. शिबिराचे उद्घाटन समता सैनिक दल ध्वजारोहण,व दीप प्रज्वलन सुजाता ओहळ यांनी केले, प्रास्तविक व सूत्र संचालन ज्योती ताई.मोकळं यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत बी. वाय.जगताप अध्यक्ष भा.बौध्दमहासभा दौंड शहर शाखा यांनी केले,या कार्यक्रमास प्रशिक्षक आयु शुभांगी.लोंढे सिनियर डीव्हींजन ऑफिसर,व उपाध्यक्ष सरक्षण पुणे शहर सतीश लोंढे डी व्हिजन ऑफिसर व सचिव पुणे शहर होते.प्रमुख पाहुणे आयु .सचिन खरात,,मंजुषा धावा रे,स्मिता भिंगारे,विलास कदम,दिलीप आढाव ,श्रीकृष्ण मोरे,मा.अध्यक्ष, सिस्टर आंलीव्ह अलवेरा इत्यादी मान्यवर होते.शिबिर यशस्वितेसाठी अंजलीताई चंदनशिवे,अतीष मोकळंशामल आढाव भाग्य श्री चिकाटे ईत्यादिनीचे सहकार्य होते

- Advertisment -

Most Popular

Recent Comments