Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्यामहिला दिनाचे औचित्यसाधून दिनेश शंकर कुऱ्हाडे यांच्या वतीने बालाजीनगर मधील शेकडो महिलांना...

महिला दिनाचे औचित्यसाधून दिनेश शंकर कुऱ्हाडे यांच्या वतीने बालाजीनगर मधील शेकडो महिलांना छावा चित्रपट दाखवण्यात आला…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ मार्च २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या समाजात स्त्रिया पुढे तो समाज पुढे… ज्या देशात महिलांची प्रगती होते तोच देश प्रगतशील असू शकतो. असा विचार मांडत त्यांनी समाजातील स्त्रियांचं महत्त्व विषद करत देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचं महत्त्व पटवून दिलं.
आई हिच सर्वांची प्रथम गुरू आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री कर्तुत्वशील असते. ती आपल्या कर्तुत्वाने माता, गुरू, बहिण, मुलगी, मैत्रीण अशा विविध भूमिका साकारत कुटुंबाच्या विकासासाठी व सन्मानासाठी समर्पण भावनेने योगदान देत असते.
परंतू स्वताच्या मनोरंजनाकरिता ती वेळ व पैसा खर्च करतनाही तोच वेळ व पैसा ती कूटूंबाच्या उन्नती करिता, मूलांच्या शिक्षणा करीता व कूटूंबाच्या मनोरंजना करीता खर्च करते पण स्वता नाही म्हणून दिनेश शंकर कुऱ्हाडे यांनी अशा माता भगीनींनकरीता आज पिंपरीत शेकडो महिलाना ऐतिहासीक चित्रपट छावा दाखवविण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांनी चित्रपट पाहून म्हणाल्या की आजचा महिला दिन सार्थकी ठरला यावेळी महिलांनी दिनेश शंकर कुऱ्हाडे यांचे आभार ही मानले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments