Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड बहुजन समाज पार्टी यांच्याकडून बिहार प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर...

दौंड बहुजन समाज पार्टी यांच्याकडून बिहार प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध

🏴🏴🏴🏴

दौंड मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड- बिहारमधील महाबोधी बुद्धविहार बुद्धगया भिक्खूंच्या ताब्यात मिळणे साठी
समर्थन,
बिहार मधील बुद्धगया स्थित महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत पवित्र व आस्थेचे स्थळ येथेच तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती होती, त्यामुळे हे संपूर्ण जगात बौध्द सर्वात महत्त्वाचे स्थान आहे
मात्र दुर्दैवाने या ठिकाणाच्या व्यवस्थापनावर बिहार प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बौध्द धर्मीयांना पूर्ण नियंत्रण नाही,
महाबोधी बुध्दविहार, बुध्दगया, बिहार येथे संवैधानिक मार्गाने सुरु असलेले बौध्द भिक्खूंचे व बौध्द उपासक उपासिकांचे आंदोलन बिहार प्रशासनाने बेकायदेशीररित्या बंद केल्यामुळे बिहार पोलीस प्रशासनाचा जाहिर निषेध करण्यात आला व महाबोधी बुध्दविहार, (बुध्दगया) बौध्द भिक्खूंच्या ताब्यात मिळणेसाठी समर्थन केले.
बहुजन समाज पार्टी दौंड विधानसभेच्या वतीने विनंती निवेदन दौंड तहसीलदार यांना देण्यात आले की, महाबोधी बुध्द विहार, बुध्दगया, बिहार हे सनातनी ब्राह्मण महंतांच्या अधिपत्याखाली आहे, ही बाब भारतीय संविधानाच्या दृष्टीने फार चुकीची आहे, त्यामुळे बौध्द भिक्खु सदरचे विहार सनातनी महंतांच्या ताब्यातून बौध्द भिक्खूंच्या ताब्यात मिळणेसाठी संवैधानिक मार्गाने आमरण उपोषणास बसले होते, त्यांना बिहार सरकारच्या गया येथील पोलीस प्रशासनाने रात्रीच्या अंधारात कारवाई करत बेकायदेशीर पध्दतीने सदरचे आंदोलन दडपण्यात आले आहे. त्यामुळे बिहार पोलीस प्रशासनाचा जाहिर निषेध करत आहोत. तसेच महाबोधी बुध्द विहार, बुध्दगया हे बौध्द भिक्खूंच्या ताब्यात देण्यासाठी बिहार सरकारने व गया येथील जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन जगभरातील बौध्द बांधवांना न्याय द्यावा, या वेळी निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे श्रीकांत आनंद सोनवणे अध्यक्ष बहुजन समाज पार्टी दौंड , सुनील शिंदे, अभिजीत डेंगळे, अक्षय शिंदे, श्रीकांत माने, दिपक धनवे, अजिंक्य सोनवणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments