Thursday, February 26, 2026
Homeनागपूरअंबाझरी, नागपूर — डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पुनर्निर्माणासाठी वंचित बहुजन आघाडीची...

अंबाझरी, नागपूर — डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या पुनर्निर्माणासाठी वंचित बहुजन आघाडीची व आंबेडकरी समाजाची ठाम भूमिका


डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, जे 1970 च्या दशकात नागपूर महानगरपालिकेने उभारले, ते पुनर्निर्माणाच्या नावाखाली पाडण्यात आले. 270 दिवसांपेक्षा जास्त काळ आंबेडकरी समाजाने सत्याग्रह केला, परंतु आजही भवनाचे बांधकाम सुरू झालेले नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटींचा निधी मंजूर केला, पण वर्षभरानंतरही पायाभरणी नाही. आश्वासनांच्या फुंक्या वायऱ्या ठरल्या, आणि समाजात संतापाची लाट उसळली आहे.

बैठकीत पुढे आलेल्या प्रमुख मागण्या:
1. सांस्कृतिक भवन की समाज भवन?
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे “समाज भवन” नव्हे. सांस्कृतिक भवन हेच अधिकृत नाव ठेवावे.
2. बांधकाम मॉडेल आणि क्षेत्रफळ:
• सार्वजनिक बांधकाम विभागाने — भवनाचा आराखडा, क्षेत्रफळ, आणि बांधकामाचे नियोजन सार्वजनिक करावे.
3. स्मारक आणि भू-सौंदर्यीकरण:
• समाजाने आधीच बाबासाहेबांचा प्रतिमा स्थापित केली आहे. परिसरात स्मारक, ग्रंथालय आणि सुंदर उद्यान विकसित करावे.
4. NOC संदर्भात अनिश्चितता:
• MTDC ने गरुडा कंपनीला जागा लीजवर दिली आहे. गरुडा NOC न देत असल्यास, सरकारने हस्तक्षेप करून बांधकाम मार्गी लावावे.
5. निधी वापरण्याची तातडीची गरज:
• 10 कोटींचा निधी वेळेत वापरला नाही, तर तो परत जाण्याची भीती आहे. 2 दिवसांत पायाभरणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.

यश सुधाकर गौरखेडे म्हणाले:
“बाबासाहेबांचं स्मारक हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सरकारने 2 दिवसांत काम सुरू केलं नाही, तर आंबाझरीत हजारोंचा ठिय्या आंदोलन होईल.”

बैठकीला उपस्थित कार्यकर्ते:
• सिद्धांत पाटील
• राहुल भीमटे
• शिशुपाल देशभ्रतार
• करण पाटील
• हरिदास गवई
• विनोद मोहोड
• अश्वित लोखंडे
• किरण गौरखेडे
• विक्की खडसे
• धीरज निकळजे
• शोभा पाटील
• अर्पित आठवले
• करुणा खडसे
• रोहित गनेर
• विजय गोनडुले‌

जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिलं की, 2 दिवसांत पायाभरणी सुरू होईल.
पण आंबेडकरी समाज आता केवळ आश्वासनांवर थांबणार नाही.

“आम्ही बाबासाहेबांचे वारस आहोत — आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही!”

जय भीम | जय संविधान

- Advertisment -

Most Popular

Recent Comments